mr_tw/bible/names/johntheapostle.md

35 lines
5.1 KiB
Markdown

# योहान (प्रेषित)
## तथ्य:
योहान हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक आणि येशूच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता.
* योहान आणि त्याचा भाऊ याकोब हे एका कोळ्याचे ज्याचे नाव जब्दी होते, त्याचे मुलगे होते.
* येशूच्या जीवनाबद्दलचे शुभवर्तमान जे त्याने लिहिले, त्यामध्ये योहान स्वतःला "येशूने ज्यावर प्रेम केले तो शिष्य" असे संदर्भित करतो. हे असे सूचित करताना दिसते की, योहान हा येशूचा विशेष जवळचा मित्र होता.
* प्रेषित योहानाने नवीन करारातील पाच प्पुस्तके लिहिली: योहानाचे शुभवर्तमान, येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण, आणि इतर विश्वासुंना लिहिलेली तीन पत्रे.
* प्रेषित योहान हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा वेगळा व्यक्ती होता, हे लक्षात ठेवा.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [प्रेषित](../kt/apostle.md), [प्रकट](../kt/reveal.md), [याकोब (जब्दीचा मुलगा)](../names/jamessonofzebedee.md), [योहान (बाप्तिस्मा करणारा)](../names/johnthebaptist.md), [जब्दी](../names/zebedee.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [गलतीकरांस पत्र 02:9-10](rc://*/tn/help/gal/02/09)
* [योहान 01:19-21](rc://*/tn/help/jhn/01/19)
* [मार्क 03:17-19](rc://*/tn/help/mrk/03/17)
* [मत्तय 04:21-22](rc://*/tn/help/mat/04/21)
* [प्रकटीकरण 01:1-3](rc://*/tn/help/rev/01/01)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[36:01](rc://*/tn/help/obs/36/01)__ एके दिवशी, येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व __योहान__ हया तिघांना आपल्या बरोबर घेतले. (__य़ोहान__ नावाचा शिष्य व ज्याने येशूचा बाप्तिस्मा केला ते दोघे एकच व्यक्ती नाहीत.) ते प्रार्थना करण्यासाठी एक उंच डोंगरावर गेले.
* __[44:01](rc://*/tn/help/obs/44/01)__ एके दिवशी पेत्र व __योहान__ मंदिरामध्ये जात होते. ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जात असतांना, त्यांनी एक लंगडा भिकारी भीक मागत असतांना पाहिला.
* __[44:06](rc://*/tn/help/obs/44/06)__ मंदिरातील पुढारी पेत्र व __योहान__ यांचे बोलणे ऐकून संतापले. म्हणून त्यांनी त्यांस धरून तुरुंगात टाकले.
* __[44:07](rc://*/tn/help/obs/44/07)__ दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व __योहान__ यांना महायाजकासमोर व इतर धर्मपुढा-यांसमोर उभे केले. त्यांनी पेत्र व __योहान__ यांना विचारले, "तुम्ही कोणत्या शक्तिद्वारे या पांगळ्या मनुष्यास बरे केले?"
* __[44:09](rc://*/tn/help/obs/44/09)__ हे ऐकून धार्मिक पुढा-यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण पेत्र व __योहान__ सामान्य व अडाणी माणसे असतांनाही त्यांच्यासमोर मोठ्या धाडसाने बोलत होते. परंतु ते येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले. मग त्यांनी पेत्राला व __योहानाला__ धमकावले व जाऊ दिले.
## शब्द माहिती:
* Strong's: G2491