mr_tw/bible/names/jethro.md

28 lines
3.4 KiB
Markdown

# इथ्रो, रगुवेल
## तथ्य:
"इथ्रो" आणि "रगुवेल" ही दोन्ही नावे मोशेची पत्नी सिप्पोरा, हिच्या पित्याला संदर्भित करतात. जुन्या करारामध्ये "रगुवेल" नावाचे आणखी दोन मनुष्य होते.
* जेंव्हा मोशे मिद्यानाच्या भूमीत मेंढपाळ होता, तेंव्हा त्याने मिद्यानी मनुष्य रगुवेल ह्याच्या मुलीशी विवाह केला.
* नंतर रगुवेलाला "इथ्रो, मिद्यानाचा याजक" म्हणून संदर्भित केले. कदाचित "रगुवेल" हे त्याच्या कुळाचे नाव असू शकते.
* जेंव्हा देव मोशेशी जळत्या झाडीद्वारे बोलला, तेंव्हा मोशे इथ्रोची मेंढरे चरित होता.
* देवाने इस्राएली लोकांना मिसरातून सोडविल्याच्या काही काळानंतर, इथ्रो वाळवंटात इस्राएली लोकांच्या जवळ आला आणि त्याने मोशेला लोकांच्या प्रकरणांचा न्याय करण्याविषयी चांगला सल्ला दिला.
* जेंव्हा त्याने इस्राएली लोकांसाठी मिसरमध्ये देवाने केलेल्या चमत्कारांबद्दल ऐकले, तेंव्हा त्याने देवावर विश्वास ठेवला.
* एसावाच्या मुलांपैकी एकचे नाव रगुवेल होते.
* अजून एक मनुष्य ज्याचे नाव रगुवेल होते, त्याचा उल्लेख इस्राएलाच्या वंशावळीत केला आहे, जो बाबेलाचा बंदिवास संपल्यानंतर पुनर्स्थापित होण्यासाठी यहुदाला परतला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बंदी](../other/captive.md), [कुळ](../other/clan.md), [वाळवंट](../other/desert.md), [मिसर](../names/egypt.md), [एसाव](../names/esau.md), [चमत्कार](../kt/miracle.md), [मोशे](../names/moses.md), [वाळवंट](../other/desert.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:34-37](rc://*/tn/help/1ch/01/34)
* [निर्गम 02:18-20](rc://*/tn/help/exo/02/18)
* [निर्गम 03:1-3](rc://*/tn/help/exo/03/01)
* [निर्गम 18:1-4](rc://*/tn/help/exo/18/01)
* [गणना 10:29-30](rc://*/tn/help/num/10/29)
Strong's: H3503, H7467