mr_tw/bible/names/jeremiah.md

30 lines
3.9 KiB
Markdown

# यिर्मया
## तथ्य:
यिर्मिया हा यहुदाच्या राज्यातील देवाचा संदेष्टा होता. जुन्या करारातील यिर्मिया नावाच्या पुस्तकात त्याच्या भविष्यवाण्या समाविष्ट आहेत.
* इतर संदेष्ट्याप्रमाणेच, यिर्मियालासुद्धा इस्राएलच्या लोकांना ताकीद द्यावी लागली की, देव त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा करणार आहे.
* यिर्मियाने असे भाकीत केले की, बाबेली लोक यरुशलेमवर कब्जा करतील, त्यामुळे यहूदाचे काही लोक संतप्त झाले. म्हणून त्यांनी त्याला एका खोल, कोरड्या विहिरीत मारण्यासाठी टाकले. परंतु यहुदाच्या राजाने त्याच्या सेवकांना यिर्मीयाला विहिरीतून बाहेर काढण्याची आज्ञा दिली.
* यिर्मियाने लिहिले की, त्याच्या लोकांच्या बंडाच्या आणि त्रासाचे खोल दुःख व्यक्त करण्यासाठी, त्याची अशी इच्छा आहे की, त्याचे डोळे हे "अश्रूंचा वाहता झरा" असावेत.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बाबेल](../names/babylon.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [बंड](../other/rebel.md), [त्रास](../other/suffer.md), [विहीर](../other/well.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 इतिहास 35:25](rc://*/tn/help/2ch/35/25)
* [यिर्मया 01:1-3](rc://*/tn/help/jer/01/01)
* [यिर्मया 11:1-2](rc://*/tn/help/jer/11/01)
* [मत्तय 02:17-18](rc://*/tn/help/mat/02/17)
* [मत्तय 16:13-16](rc://*/tn/help/mat/16/13)
* [मत्तय 27:9-10](rc://*/tn/help/mat/27/09)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[19:17](rc://*/tn/help/obs/19/17)__ एकदा त्यांनी __यिर्मया__ संदेष्टयास मरण्यानाठी कोरड्या विहिरीमध्ये ढकलून दिले. * विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळामध्ये तो रुतला, परंतु नंतर राजाला त्याची दया आली व __यिर्मया__ मरण्यापुर्वी त्याला बाहेर काढण्याची त्याने त्याच्या सेवकांना आज्ञा दिली.
* __[21:05](rc://*/tn/help/obs/21/05)__ __यिर्मया__ संदेष्टयाच्या द्वारे, देवाने वचन दिले की तो एक नवा करार करणार आहे, परंतु तो सिनाय पर्वतावर इस्राएलांबरोबर केलेल्या करारासारखा नसेल.
Strong's: H3414, G2408