2.3 KiB
2.3 KiB
याकोब (येशूचा भाऊ)
तथ्य:
- याकोब हा मरिया आणि योसेफाचा मुलगा होता. तो येशूचा लहान सावत्र भाऊ होता.
- येशूचे इतर सावत्र भावांची नावे योसेफ, यहूदा आणि शिमोन अशी होती.
- येशूच्या जीवनकाळात, याकोब आणि त्याच्या भावांनी येशू हाच मसिहा आहे यावर विश्वास ठेवला नाही.
- नंतर, येशू मरणातून जिवंत उठल्यानंतर, याकोबाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि यरुशलेममधील एका मंडळीचा पुढारी बनला.
- नवीन करारातील याकोबाचे पुस्तक, हे याकोबाने अशा ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे, जे लोक छळापासून वाचण्यासाठी इतर देशात पळून गेले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: प्रेषित, ख्रिस्त, मंडळी, याकोबाचा पुत्र यहुदा, छळ करणे)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- गलतीकरांस पत्र 1:18-20
- गलतीकरांस पत्र 2:9-10
- याकोबाचे पत्र 1:1-3
- यहूदाचे पत्र 1:1-2
- मार्क 9:1-3
- मत्तय 13:54-56
शब्द माहीती
- स्ट्रोंग: G2385