mr_tw/bible/names/jacob.md

40 lines
5.6 KiB
Markdown

# इस्राएल, इस्राएली, याकोब
## तथ्य:
याकोब हा इसहाक आणि रिबका यांच्या जुळ्या मुलातील लहान मुलगा होता.
* याकोबाचे नाव म्हणजे "त्याने टाच पकडली" म्हणजे "त्याने फसवले" ही अभिव्यक्ती आहे. जसा याकोब जन्म घेत होता, तो त्याचा जुळा भाऊ एसाव ह्याच्या टाचांना धरून होता.
* अनेक वर्षानंतर, देवाने याकोबाचे नाव इस्राएल मध्ये बदलले, ह्याचा अर्थ "त्याने देवाबरोबर संघर्ष केला" असा होतो.
* याकोब चतुर आणि फसवा होता. त्याने त्याच्या मोठ्या भावाचे एसावचे पहिल्या अपत्याचा आशीर्वाद आणि वारसा हक्क मिळवण्याचे मार्ग शोधले.
* एसाव रागात होता आणि त्याने त्याला मारण्याची योजना आखली, म्हणून याकोबने त्याचे मूळभूमी सोडली. परंतु, अनेक वर्षानंतर याकोब त्याच्या पत्नी आणि मुलांबरोबर कनानच्या देशास परत आला, जिथे त्याचा भाऊ एसाव राहा होता, आणि त्यांची कुटुंबे एकमेकांशेजारी शांतीने राहिली.
* याकोबाला बारा मुलगे झाले. * त्याचे वंशज इस्राएलाचे बारा वंश बनले.
* याकोबा नावाचा एक वेगळा माणूस मत्तयाच्या वंशावळीत योसेफाचा पिता म्हणून सूचीबद्ध आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [कनान](../names/canaan.md), [फसवणे](../other/deceive.md), [एसाव](../names/esau.md), [इसहाक](../names/isaac.md), [इस्राएल](../kt/israel.md), [रिबका](../names/rebekah.md), [इस्राएलाचे बारा वंशज](../other/12tribesofisrael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 07:11](rc://*/tn/help/act/07/11)
* [प्रेषितांची कृत्ये 07:46](rc://*/tn/help/act/07/44)
* [उत्पत्ति 25:26](rc://*/tn/help/gen/25/24)
* [उत्पत्ति 29:1-3](rc://*/tn/help/gen/29/01)
* [उत्पत्ति 32:1-2](rc://*/tn/help/gen/32/01)
* [योहान 04:4-5](rc://*/tn/help/jhn/04/04)
* [मत्तय 08:11-13](rc://*/tn/help/mat/08/11)
* [मत्तय 22:32](rc://*/tn/help/mat/22/31)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[07:01](rc://*/tn/help/obs/07/01)__ ही मुले वाढत असतांना, __याकोबाला__ घरीच राहायला आवडत असे, परंतु एसावाला शिकार करायला आवडत असे. __याकोब__ रिबकेचा आवडता होता, परंतु इसहाकाला एसाव आवडत होता.
* __[07:07](rc://*/tn/help/obs/07/07)__ __याकोब__ बरीच वर्षे रिबकेच्या नातेवाईकांबरोबर राहिला. या कालावधीमध्ये त्याने लग्न केले व त्यास बारा पुत्र व एक कन्या झाली. परमेश्वराने त्यास खूप श्रीमंत बनविले.
* __[07:08](rc://*/tn/help/obs/07/08)__ त्यानंतर वीस वर्षांनी कनानामध्ये असणा-या आपल्या घरी, __याकोब__ आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.
* __[07:10](rc://*/tn/help/obs/07/10)__ देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसहाकाकडून __याकोबाकडे__ सुपूर्त करण्यात आले.
* __[08:01](rc://*/tn/help/obs/08/01)__ ब-याच वर्षांनंतर __याकोब__ वयोवृद्ध झाला असतांना, त्याने आपला आवडता पुत्र, योसेफ, यास मेंढरांचे राखण करत असलेल्या आपल्या जेष्ठ भावांकडे त्यांचे कसेकाय चालले आहे हे पाहाण्यास पाठविले.
## शब्द माहिती:
* Strong's: H3290, G2384