mr_tw/bible/names/isaiah.md

41 lines
5.1 KiB
Markdown

# यशया
## तथ्य:
यशया हा एक देवाचा संदेष्टा होता, त्याने यहूदाचे चार राजे राज्य करण्याच्या काळात भविष्यवाणी केली: उज्जीया, योथाम, अहाज, आणि हिज्कीया.
* हिज्कीयाच्या कारकिर्दीदरम्यान, जेंव्हा अश्शूरी लोक जेव्हा शहरावर हल्ला करत होते, त्या काळात तो यरुशलेममध्ये राहात असे.
* जुन्या करारातील यशया नावाचे पुस्तक, हे पवित्र शास्त्रातील अनेक मोठ्या पुस्तकांपैकी एक आहे.
* यशयाने अनेक भविष्यवाण्या लिहिल्या, त्या तो जिवंत असतानाच खऱ्या झाल्या.
* यशया त्याने मसिहाबद्दल लिहिलेल्या भविष्यवाणींसाठी प्रसिद्ध आहे, त्या 700 वर्षानंतर जेंव्हा येशू पृथ्वीवर राहत होता, त्यावेळी पूर्ण झाल्या.
* येशू आणि त्याच्या शिष्यांनी यशयाच्या भविष्यवाण्यांचा उल्लेख, लोकांना मसिहाबद्दल शिकवताना उदाहरणादाखल केला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [अहाज](../names/ahaz.md), [अश्शुरी](../names/assyria.md), [ख्रिस्त](../kt/christ.md), [हिज्कीया](../names/hezekiah.md), [योथाम](../names/jotham.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [उज्जीया](../names/uzziah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 राजे 20:1-3](rc://*/tn/help/2ki/20/01)
* [प्रेषितांची कृत्ये 28:26](rc://*/tn/help/act/28/25)
* [यशया 01:1](rc://*/tn/help/isa/01/01)
* [लुक 03:4](rc://*/tn/help/luk/03/04)
* [मार्क 01:1](rc://*/tn/help/mrk/01/01)
* [मार्क 07:6](rc://*/tn/help/mrk/07/06)
* [मत्तय 03:3](rc://*/tn/help/mat/03/01)
* [मत्तय 04:14](rc://*/tn/help/mat/04/14)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[21:09](rc://*/tn/help/obs/21/09)__ __यशया__ संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.
* __[21:10](rc://*/tn/help/obs/21/10)__ __यशया__ संदेष्टा म्हणाला की मसिहा गालीलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील.
* __[21:11](rc://*/tn/help/obs/21/11)__ __यशया__ संदेष्टयाने हेही भाकित केले की मसिहाचा विनाकारण द्वेश केला जाईल व त्याला नाकारले जाईल.
* __[21:12](rc://*/tn/help/obs/21/12)__ __यशयाने__ भविष्य केले होते की लोक मसिहावर थुंकतील, त्याची थट्टा करतील व त्यास फटके मारतील.
* __[26:02](rc://*/tn/help/obs/26/02)__ त्यांनी त्यास __यशया__ संदेष्टयाच्या ग्रंथाची गुंडाळी वाचण्यासाठी दिली. येशूने ती गुंडाळी उघडून त्यातील कांही भाग लोकांसमोर वाचला.
* __[45:08](rc://*/tn/help/obs/45/08)__ जेव्हा फिलिप्प रथाजवळ आला, तेव्हा त्याने तो कूशी __यशया__ संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत असताना ऐकले.
* __[45:10](rc://*/tn/help/obs/45/10)__ फिलिप्पाने त्या कूशीस स्पष्टिकरण देत सांगितले की __यशया__ संदेष्टा हे मसिहाविषयी लिहित आहे.
## शब्द माहिती:
* Strong's: H3470, G2268