mr_tw/bible/names/isaac.md

38 lines
5.6 KiB
Markdown

# इसहाक
## तथ्य:
इसहाक हा अब्राहम आणि साराय यांचा एकुलता एक मुलगा होता. जरी ते फार वृद्ध होते, तरी देवाने त्यांना एक मुलगा देण्याचे वचन दिले होते.
* इसहाक या नावाचा अर्थ "तो हसतो" असा होतो. जेंव्हा देवाने अब्राहामाला सांगितले की सारा एका मुलाला जन्म देईल, तेंव्हा अब्राहाम हसला कारण ते दोघेही फार वृद्ध होते. काही काळानंतर, ती बातमी ऐकली तेव्हा सारा देखील हसली.
* परंतु देवाने त्याचे वचन पूर्ण केले आणि इसहाकाचा जन्म अब्राहम आणि सराय ह्यांच्या वृद्ध वयात झाला.
* देवाने अब्राहमाला सांगितले की, जो करार त्याने अब्राहमाशी केला आहे तोच करार इसहाक आणि त्याच्या वंशाजांसाठी कायमस्वरूपाचा राहील.
* जेंव्हा इसहाक तरुण होता, तेंव्हा देवाने अब्राहमाला इसहाकाचे बलीदान देण्याची आज्ञा करून, त्याच्या विश्वासाची परीक्षा घेतली.
* इसहाकाचा मुलगा याकोब ह्याला बारा मुलगे होते, त्याचे वंशज नंतर इस्राएलाचे बारा वंश बनले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [अब्राहम](../names/abraham.md), [वंशज](../other/descendant.md), [अनंतकाळ](../kt/eternity.md), [परिपूर्ण होणे](../kt/fulfill.md), [याकोब](../names/jacob.md), [सराय](../names/sarah.md), [इस्राएलाचे बारा वंशज](../other/12tribesofisrael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [गलतीकरांस पत्र 4:28-29](rc://*/tn/help/gal/04/28)
* [उत्पत्ति 25:9-11](rc://*/tn/help/gen/25/09)
* [उत्पत्ति 25:19-20](rc://*/tn/help/gen/25/19)
* [उत्पत्ति 26:1](rc://*/tn/help/gen/26/01)
* [उत्पत्ति 26:6-8](rc://*/tn/help/gen/26/06)
* [उत्पत्ति 28:1-2](rc://*/tn/help/gen/28/01)
* [उत्पत्ति 31:18](rc://*/tn/help/gen/31/17)
* [मत्तय 8:11-13](rc://*/tn/help/mat/08/11)
* [मत्तय 22:32](rc://*/tn/help/mat/22/31)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* **[05:04](rc://*/tn/help/obs/05/04)** “तुझी पत्नी साराय हीला पुत्र होईल- तोच खरा वारसदार होईल. त्याचे नाव **इसहाक** ठेव.
* **[05:06](rc://*/tn/help/obs/05/06)** जेव्हा **इसहाक** तरूण झाला तेंव्हा देवाने अब्राहमाच्या विश्वासाची परिक्षा पाहाण्यासाठी, तो म्हणाला, “इसहाक, तुझा एकुलता एक पुत्र **इसहाक** याला घे व त्याचे मला होमार्पण कर.”
* **[05:09](rc://*/tn/help/obs/05/09)** **इसहाकाच्या** ठिकाणी देवाने एडका पुरविला होता.
* **[06:01](rc://*/tn/help/obs/06/01)** जेंव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेंव्हा त्याचा मुलगा, **इसहाक** तरूण पुरुष झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा **इसहाक**,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.
* **[06:05](rc://*/tn/help/obs/06/05)** **इसहाकाने** रिबेकासाठी प्रार्थना केली, व देवाच्या कृपेने ती गरोदर राहीली व तिच्या पोटात जुळी मुले होती.
* **[07:10](rc://*/tn/help/obs/07/10)** मग **इसहाक** मरण पावला, आणि याकोब व एसावाने त्यास पुरले. * देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता **इसहाकाकडून**याकोबाकडे सुपूर्त करण्यात आले.
* स्ट्रोंग: H3327, H3446, G2464