mr_tw/bible/names/hezekiah.md

23 lines
2.7 KiB
Markdown

# हिज्कीया
## व्याख्या:
हिज्कीया हा यहुदाच्या राज्यवर राज्य करणारा 13 वा राजा होता. तो देवावर विश्वास ठेवणारा आणि त्याची आज्ञा पाळणारा राजा होता.
* त्याचा पिता अहाज, जो एक दुष्ट राजा होता, त्याच्यासारखे न होता, हिज्कीया राजा चांगला राजा होता, ज्याने यहुदामधील मूर्तीच्या उपासनेच्या सर्व जागांचा नाश केला.
* एकेकाळी, जेंव्हा हिज्कीया राजा अतिशय आजारी पडला होता, आणि जवळपास मरणास टेकला होता, तेंव्हा त्याने देवाला, त्याचा जीव वाचवण्याची कळकळीची विनंती केली. देवाने त्याला बरे केले आणि त्याला 15 वर्षे अधिक जगण्याची परवानगी दिली.
* हे घडले आहे, ह्याचे हिज्कीयासाठीचे चिन्ह म्हणून, देवाने सूर्याला आकाशात मागे सरकण्यास लावून चमत्कार केला.
* जेंव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला, तेंव्हा देवाने, हिज्कीयाने त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी केलेली प्रार्थनासुद्धा ऐकली.
(हे सुद्धा पहा: [अहाज](../names/ahaz.md), [अश्शुरी](../names/assyria.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [यहूदा](../names/judah.md), [सन्हेरीब](../names/sennacherib.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 03:13-14](rc://*/tn/help/1ch/03/13)
* [2 राजे 16:19-20](rc://*/tn/help/2ki/16/19)
* [होशे 01:1-2](rc://*/tn/help/hos/01/01)
* [मत्तय 01:9-11](rc://*/tn/help/mat/01/09)
* [नीतिसूत्रे 25:1-3](rc://*/tn/help/pro/25/01)
Strong's: H2396, H3169, G1478