mr_tw/bible/names/hananiah.md

27 lines
2.9 KiB
Markdown

# हनन्या
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये हनन्या नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
* हनन्या नावाचा एक मनुष्य, बाबेलमध्ये इस्राएली बंदिवान म्हणून होता, ज्याचे नाव बदलून "शद्रख" असे ठेवण्यात आले.
* त्याला शाही सेवक हे पद, त्याच्या उत्कृष्ट चरित्र आणि क्षमता यामुळे देण्यात आले होते.
* एकदा हनन्या (शद्रख) आणि दुसरे इतर दोन इस्राएली तरुण पुरुष ह्यांना आगीच्या भट्टीमध्ये फेकण्यात आले, कारण त्यांनी बाबेली राजाची उपासना करण्यास नकार दिला. देवाने त्यांची हानी होण्यापासून त्यांचे संरक्षण करून, स्वतःचे सामर्थ्य दाखवून दिले.
* अजून एक हनन्या नावाच्या मनुष्याचे नाव शलमोन राजाच्या वंशाजाच्या यादीमध्ये नोंद करण्यात आले आहे.
* एक दुसरा हनन्या हा, यिर्मया संदेष्टा, ह्याच्या काळातील एक खोटा संदेष्टा होता.
* अजून एक हनन्या नावाचा मनुष्य जो याजक होता, त्याने नहेम्याच्या काळात उत्सवामध्ये नेतृत्व करण्यात मदत केली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [अजऱ्या](../names/azariah.md), [बाबेल](../names/babylon.md), [दानीएल](../names/daniel.md), [खोटा संदेष्टा](../other/falseprophet.md), [यिर्मिया](../names/jeremiah.md), [मीशाएल](../names/mishael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानीएल 01:6-7](rc://*/tn/help/dan/01/06)
* [दानीएल 02:17-18](rc://*/tn/help/dan/02/17)
* [यिर्मया 28:1-2](rc://*/tn/help/jer/28/01)
* [यिर्मया 28:5-7](rc://*/tn/help/jer/28/05)
* [यिर्मया 28:15-17](rc://*/tn/help/jer/28/15)
Strong's: H2608