mr_tw/bible/names/hamath.md

26 lines
2.4 KiB
Markdown

# हमाथ, हमाथी, लेबो हमाथ
## तथ्य:
हमाथ ही उत्तरी सुरियामधील (अराम), कनानच्या भूमीच्या उत्तरेस असलेले, महत्वाचे शहर होते. हमाथी हे नोहाचा मुलगा कनान ह्याचे वंशज होते.
* "लेबो हमाथ" हे नाव कदाचित हमाथ शहराजवळील डोंगराच्या संदर्भात आहे.
* काही आवृत्त्या "लेबो हमाथ" चे भाषांतर "हमाथचे प्रवेशद्वार" असे करतात.
* दावीद राजाने हमाथचा राजा तोवू ह्याच्या शत्रूंचा पराजय केला, त्यामुळे ते चांगल्या पदावर गेले.
* हमाथ हे शलमोन राजाच्या भांडाराच्या शहरांपैकी एक होते, जिथे रसद ठेवली जात होती.
* हमाथची भूमी, जिथे सिद्कीया राजा नबुखदनेस्सर राजाकडून मारला गेला, आणि जिथे यहोअहाज राजाला मिसरी फारोने बंदी केले.
* "हमाथी" या शब्दाचे भाषांतर "हमाथ शहरमध्ये राहणारा व्यक्ती" असेही केले जाऊ शकते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बाबेल](../names/babylon.md), [कनान](../names/canaan.md), [नबुखदनेस्सर](../names/nebuchadnezzar.md), [सुरिया (अराम)](../names/syria.md), [सिद्कीया](../names/zedekiah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 18:3-4](rc://*/tn/help/1ch/18/03)
* [2 शमुवेल 08:9-10](rc://*/tn/help/2sa/08/09)
* [आमोस 06:1-2](rc://*/tn/help/amo/06/01)
* [यहेज्केल 47:15-17](rc://*/tn/help/ezk/47/15)
Strong's: H2574, H2577