35 lines
5.1 KiB
Markdown
35 lines
5.1 KiB
Markdown
# गिदोन
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
गिदोन हा एक इस्राएली मनुष्य होता, ज्याला देवाने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून सोडवण्यासाठी उभारले होते.
|
||
|
||
* गिदोन जगण्याच्या काळामध्ये, मिद्यानी नावाचा लोकसमूह इस्राएल लोकांवर सतत हल्ला करून त्यांच्या पिकांचे नुकसान करत असे.
|
||
* जरी गिदोन घाबरलेला होता, तरी देवाने त्याचा उपयोग, मिद्यानी लोकांच्या विरुद्ध लढून त्यांना पराजित करण्यासाठी इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्यासाठी केला.
|
||
* गिदोनाने देवाची आज्ञा मानत खोटे देव बाल आणि अशेरा ह्यांच्या वेद्या पाडून टाकल्या.
|
||
* त्याने इस्राएल लोकांचे नेतृत्व फक्त त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठीच नाही केले तर यहोवा, एकच खरा देव ह्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठीसुद्धा त्यांना उत्साहित केले.
|
||
|
||
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
||
|
||
(हे सुद्धा पहा: [बाल](../names/baal.md), [अशेरा](../names/asherim.md), [सोडवणे](../other/deliverer.md), [मिद्यान](../names/midian.md), [यहोवा](../kt/yahweh.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [इब्री लोकांस पत्र 11:32-34](rc://*/tn/help/heb/11/32)
|
||
* [शास्ते 06:11-12](rc://*/tn/help/jdg/06/11)
|
||
* [शास्ते 06:22-24](rc://*/tn/help/jdg/06/22)
|
||
* [शास्ते 08:15-17](rc://*/tn/help/jdg/08/15)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[16:05](rc://*/tn/help/obs/16/05)__ यहोवाचा एक दूत येऊन __गिदोनाला__ म्हणाला, ‘‘हे बलवान वीरा, देव तुझ्याबरोबर आहे. जा आणि इस्त्राएलाला मिद्यान्यांच्या हातातून सोडव.’’
|
||
* __[16:06](rc://*/tn/help/obs/16/06)__ __गिदोनाच्या__ पित्याने एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती. देवाने __गिदोनास__ ती वेदी तोडण्यास सांगितले.
|
||
* __[16:08](rc://*/tn/help/obs/16/08)__ ते इतके पुष्कळ होते की, ते मोजण्याच्या पलीकडे होते. __गिदोनाने__ इस्त्राएल लोकांस एकत्र बोलावून मिद्यान्यांशी युध्द करण्यास तयार केले.
|
||
* __[16:08](rc://*/tn/help/obs/16/08)__ __गिदोनाने__ देव आपणास इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मागितली.
|
||
* __[16:10](rc://*/tn/help/obs/16/10)__ 32,000 इस्त्रायली सैनिक __गिदोनकडे__ आले, परंतु देवाने त्याला सांगितले की, ते खूप आहेत.
|
||
* __[16:12](rc://*/tn/help/obs/16/12)__ मग __गिदोन__ आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली.
|
||
* __[16:15](rc://*/tn/help/obs/16/15)__ लोक __गिदोनास__ आपला राजा बनवू पहात होते.
|
||
* __[16:16](rc://*/tn/help/obs/16/16)__ मग __गिदोनाने__ त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले. परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले.
|
||
|
||
Strong's: H1439, H1441
|