mr_tw/bible/names/gibeon.md

27 lines
3.1 KiB
Markdown

# गीबोन, गीबोनी, गीबोनांच्या
## तथ्य:
गीबोन हे एक शहर होते, जे यरुशलेमेच्या उत्तर पश्चिमेस 13 किलोमीटर अंतरावर स्थित होते. गीबोनमध्ये राहणाऱ्या लोकांना गीबोनी असे म्हंटले जात होते.
* जेंव्हा गीबोनाच्या लोकांनी ऐकले की, कसे इस्राएली लोकांनी यरीहो आणि आय शहरांचा नाश केला, तेंव्हा ते घाबरले.
* म्हणून गीबोनी लोक इस्राएलाच्या पुढाऱ्यांजवळ गील्गाल येथे आले, आणि त्यांनी असे सोंग केले की, ते दूर देशाचे लोक आहेत.
* इस्राएली पुढारी फसले गेले आणि त्यांनी गीबोनाच्या लोकांच्याबरोबर करार केला की, ते त्यांना संरक्षण देतील आणि त्यांचा नाश करणार नाहीत.
(हे सुद्धा पहा: [गील्गाल](../names/gilgal.md), [यरीहो](../names/jericho.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 08:29-31](rc://*/tn/help/1ch/08/29)
* [1 राजे 03:4-5](rc://*/tn/help/1ki/03/04)
* [2 शमुवेल 02:12-13](rc://*/tn/help/2sa/02/12)
* [यहोशवा 09:3-5](rc://*/tn/help/jos/09/03)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[15:06](rc://*/tn/help/obs/15/06)__ परंतु __गिबोनी__ नावाचा कनानमधील एक लोकगट यहोशवाबरोबर खोटे बोलला ते म्हणाले की ते कनानापासून खूप लांब रहतात.
* __[15:07](rc://*/tn/help/obs/15/07)__ काही काळानंतर, कनानमधील इतर लोकगटाच्या राजांनी, अमोरी लोकांनी, ऐकले की __गिबोनी__ लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला.
* __[15:08](rc://*/tn/help/obs/15/08)__ यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या सैनिकांस जमा केले व __गिबोन्यांकडे__ पोहोचण्यासाठी रात्रभर चालत राहिले.
Strong's: H1391, H1393