mr_tw/bible/names/galatia.md

24 lines
2.6 KiB
Markdown

# गलती, गलतीकरांस
## तथ्य:
नवीन करारामध्ये, गलती हा मोठा रोमी प्रांत होता, जो आताचा तुर्की देश आहे त्याच्या मध्य भागात स्थित होते.
* गलती या देशाच्या काही भागाच्या सीमेलगत काळा समुद्र होता, जो त्याच्या उत्तरेस होता. याच्या सीमेलगत आशिया, बिथूनिया, कप्पदुकिया, किलिकिया, आणि पंम्फुलिया हे प्रांत होते.
* प्रेषित पौलाने गलती प्रांतामध्ये राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांना पत्र लिहिले. या पत्राला नवीन करारामधील पुस्तक "गलतीकरांस पत्र" असे म्हटले गेले.
* गलतीकरांस पत्र लिहिण्याचे एक कारण म्हणजे तारण हे कृपेद्वारे होते, कृत्यांद्वारे नाही, ह्यावर भर देणे हे आहे.
* तिथे असलेल्या परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांना, यहुदी ख्रिस्ती लोक, काही विशिष्ठ यहुदी नियम पाळणे गरजेचे आहे, असे चुकीचे शिक्षण देत होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [आशिया](../names/asia.md), [विश्वास](../kt/believe.md), [किलीकिया](../names/cilicia.md), [शुभ वार्ता](../kt/goodnews.md), [पौल](../names/paul.md), [काम](../kt/works.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 16:1-2](rc://*/tn/help/1co/16/01)
* [1 पेत्र 01:1-2](rc://*/tn/help/1pe/01/01)
* [2 तीमथी 04:9-10](rc://*/tn/help/2ti/04/09)
* [प्रेषितांची कृत्ये 16:6-8](rc://*/tn/help/act/16/06)
* [गलतीकरांस पत्र 01:1-2](rc://*/tn/help/gal/01/01)
* Strong's: G1053, G1054