mr_tw/bible/names/gabriel.md

23 lines
3.0 KiB
Markdown

# गब्रीएल
## तथ्य:
* गब्रीएल हे देवाच्या एका दूताचे नाव होते. त्याला जुना आणि नवा करार दोन्हीमध्ये, त्याच्या नावाने बऱ्याचदा उल्लेखण्यात आले आहे.
* देवाने गब्रीएलाला, दानीएल संदेष्ट्याने बघितलेल्या दृष्टांताचा अर्थ सांगण्यासाठी पाठवले.
* अजून एका वेळी, दानीएल प्रार्थना करत असताना, गब्रीएल देवदूत त्याच्या जवळ उडत उडत आला आणि त्याने भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टींबद्दल भविष्यवाणी केली. दानीएलाने त्याचे वर्णन एक "मनुष्य" असे केले.
* नवीन करारामध्ये याची नोंद केलेली आहे की, गब्रीएल देवदूत जखऱ्या जवळ आला आणि त्याने भविष्यवाणी केली, की त्याच्या वृद्ध पत्नीला, अलीशिबेला एक मुलगा. योहान, होईल.
* त्याच्या सहा महिन्यानंतर, गब्रीएलाला मरीयेकडे हे सांगण्यासाठी पाठवण्यात आले की, देव तिला चमत्कारिकरित्या गर्भ धारण करण्यास सक्षम करेल आणि जो पुत्र होईल तो "देवाचा पुत्र" असेल. गब्रीएलाने मरीयेला त्याचे नाव "येशू" ठेवण्यास सांगितले. (भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [देवदूत](../kt/angel.md), [दानीएल](../names/daniel.md), [अलिशिबा](../names/elizabeth.md), [(बाप्तिस्मा करणारा) योहान](../names/johnthebaptist.md), [मरिया](../names/mary.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [देवाचा पुत्र](../kt/sonofgod.md), [जखऱ्या](../names/zechariahnt.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानीएल 08:15-17](rc://*/tn/help/dan/08/15)
* [दानीएल 09:21](rc://*/tn/help/dan/09/20)
* [लुक 01:19](rc://*/tn/help/luk/01/18)
* [लुक 01:26](rc://*/tn/help/luk/01/26)
## शब्द माहिती:
* Strong's: H1403, G1043