40 lines
5.9 KiB
Markdown
40 lines
5.9 KiB
Markdown
# एलीया
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
एलीया हा यहोवाचा सर्वात महत्त्वाचा संदेष्टा होता. इस्राएलाचे आणि यहूदाचे अनेक राजे राज्य करण्याच्या काळादरम्यान एलीयाने भविष्यवाणी केली, ज्यामध्ये अहाब राजाचा देखील समावेश आहे.
|
||
|
||
* देवाने एलीयाद्वारे अनके चमत्कार केले, ज्यामध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचा देखील समावेश आहे.
|
||
* एलीयाने अहाब राजाला बाल नावाच्या खोट्या देवाची उपासना करण्याबद्दल दोष लावला.
|
||
* त्याने बालच्या संदेष्ट्यांना एका परीक्षेत आव्हान दिले; त्याने हे सिद्ध झाले की यहोवा एकच खरा देव आहे.
|
||
* एलीयाच्या जीवनाच्या शेवटी, तो अद्याप जिवंत असतानाच देवाने त्याला अद्भूतरीत्या स्वर्गात नेले.
|
||
* शेकडो वर्षांनंतर, एलीया आणि मोशेसोबत येशू डोंगरावर दिसला आणि ते यरुशलेममध्ये येशूच्या येणाऱ्या दुःखाबद्दल आणि मृत्यूबद्दल एकत्र बोलले.
|
||
|
||
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
||
|
||
(हे देखील पाहा: [चमत्कार](../kt/miracle.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [यहोवा](../kt/yahweh.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [1 राजे 17:1](rc://*/tn/help/1ki/17/01)
|
||
* [2 राजे 1:3-4](rc://*/tn/help/2ki/01/03)
|
||
* [याकोबाचे पत्र 5:16-18](rc://*/tn/help/jas/05/16)
|
||
* [योहान 1:19-21](rc://*/tn/help/jhn/01/19)
|
||
* [योहान 1:24-25](rc://*/tn/help/jhn/01/24)
|
||
* [मार्क 9:5](rc://*/tn/help/mrk/09/04)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* **[19:02](rc://*/tn/help/obs/19/02)** जेव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. **अहाब** हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.
|
||
* **[19:02](rc://*/tn/help/obs/19/02)** **एलीया** अहाबास म्हणला, ‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाही.’’
|
||
* **[19:03](rc://*/tn/help/obs/19/03)** अहाब **एलीयास** जिवे मारु इच्छित होता म्हणून देवाने एलीयास जंगलातील एका ओहोळाजवळ लपून राहाण्यास सांगितले. प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देवाने त्यास भोजन पुरविले.
|
||
* **[19:04](rc://*/tn/help/obs/19/04)** परंतु त्यांनी **एलीयाची** काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुप्पीतील तेल कधीच संपले नाही.
|
||
* **[19:05](rc://*/tn/help/obs/19/05)** साडेतीन वर्षानंतर देवाने **एलीयास** इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली.
|
||
* **[19:07](rc://*/tn/help/obs/19/07)** मग **एलीया** बाल देवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका."
|
||
* **[19:12](rc://*/tn/help/obs/19/12)** तेव्हा **एलीया** त्यांस म्हणाला,‘‘बआलाच्या संदेष्टयांस पकडा; त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका!’’
|
||
* **[36:03](rc://*/tn/help/obs/36/03)** तेव्हा मोशे व **एलीया** हे संदेष्टे त्यांच्या दृष्टीस पडले. ही माणसे शेकडो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मृत्युविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरुशलेममध्ये घडणार होते.
|
||
|
||
## शब्द माहीती:
|
||
|
||
* स्ट्रोंग: H0452, G22430
|