mr_tw/bible/names/egypt.md

37 lines
4.4 KiB
Markdown

# मिसर, मिसरी
## तथ्य:
मिसर हा देश आफ्रिकेच्या ईशान्य भागात, कनान देशाच्या नैऋत्येस आहे. मिसरी हा एक व्यक्ती आहे जो मिसर देशाचा आहे.
* प्राचीनकाळी, मिसर एक शक्तिशाली आणि समृद्ध देश होता
* प्राचीन मिसर दोन भागांमध्ये विभागलेला होता, खालचा भाग (उत्तरी भाग, जिथे नील नदीचा प्रवाह खाली समुद्राकडे वाहत जातो) आणि वरचा भाग (दक्षिणी भाग). जुन्या करारामध्ये, या भागांना मूळ भाषेच्या मजकुरात "मिसर" आणि "पथ्रोस" असे संदर्भित केले गेले आहे.
* अनेक वेळा, जेंव्हा कनानमध्ये फारसे अन्न नव्हते, तेव्हा इस्राएली कुटुंबप्रमुखांनी आपल्या कुटुंबासाठी अन्न विकत घेण्यासाठी मिसर देशाचा प्रवास केला.
* कित्येक शेकडो वर्षांपर्यंत इस्राएली लोक मिसरमध्ये गुलाम म्हणून होते.
* महान हेरोदापासून वाचण्यासाठी योसेफ आणि मरिया हे येशू बाळासोबत मिसरला निघून गेले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [महान हेरोद](../names/herodthegreat.md), [योसेफ(नविन करार)](../names/josephnt.md), [नील नदी](../names/nileriver.md), [कुटुंबप्रमुख](../other/patriarchs.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 शमुवेल 4:7-9](rc://*/tn/help/1sa/04/07)
* [प्रेषितांची कृत्ये 7:10](rc://*/tn/help/act/07/09)
* [निर्गम 3:7](rc://*/tn/help/exo/03/07)
* [उत्पत्ति 41:29](rc://*/tn/help/gen/41/27)
* [उत्पत्ति 41:57](rc://*/tn/help/gen/41/55)
* [मत्तय 2:15](rc://*/tn/help/mat/02/13)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* **[08:04](rc://*/tn/help/obs/08/04)** त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास **मिसर** देशामध्ये आणले. नील नदीच्या तीरावर वसलेला **मिसर** देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता.
* **[08:08](rc://*/tn/help/obs/08/08)** फारो योसेफवर इतका प्रभावित झाला की त्याने त्याला संपूर्ण **मिसर** देशामधील दुसरा सर्वात शक्तिशाली माणूस म्हणून नियुक्त केले!
* **[08:11](rc://*/tn/help/obs/08/11)** मग याकोबाने आपल्या मोठ्या मुलांस अन्न विकत घेण्यासाठी **मिसर** देशात पाठविले.
* **[08:14](rc://*/tn/help/obs/08/14)** जरी याकोब आता वृद्ध झाला होता, तरीही तो आपल्या कुटुंबियांसह **मिसर** देशात आला व ते सर्व तेथे राहू लागले.
* **[09:01](rc://*/tn/help/obs/09/01)** योसेफ मृत्यु पावल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक **मिसर** देशात राहत होते.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H4713, H4714, G124, G125