mr_tw/bible/names/daniel.md

27 lines
3.1 KiB
Markdown

# दानीएल
## तथ्य:
दानीएल हा एक इस्राएली संदेष्टा होता, ज्याला तो तरुण असताना बाबेलाचा राजा नबूखद्नेस्सर ह्याच्याद्वारे सुमारे ई. स. पूर्व 600 मध्ये बंदिवान म्हणून नेण्यात आले.
* यहूदातील इतर अनेक इस्राएली लोक बाबेलामध्ये 70 वर्षे बंदिवान असण्याच्या काळात हे होते.
* दानीएलाला बेल्टशस्सर हे बाबेली नाव देण्यात आले होते.
* दानीएलहा सन्माननीय आणि नीतिमान तरुण पुरुष होता, जो देवाची आज्ञा पाळत होता.
* देवाने दानीएलाला बाबेलाच्या राजासाठी अनेक स्वप्नांचे किंवा दर्शनांचे अर्थ लावण्यास सक्षम केले.
* या क्षमतेमुळे आणि त्याच्या सन्माननीय चारित्र्यामुळे, दानीएलाला बाबेलाच्या साम्राज्यामध्ये उच्च नेतृत्वाचे पद देण्यात आले होते.
* अनेक वर्षानंतर, दानीएलाच्या शत्रूंनी बाबेलच्या राजाला, राजाची सोडून इतर कोणाचीही उपासना करण्यास बंदी करण्याचा नियम बनवण्यास लावून फसवले. दानीएलाने देवाची प्रार्थना करणे चालू ठेवले, त्यामुळे त्याला अटक करून सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले. पण देवाने त्याला सोडवले आणि त्याला काहीही इजा होऊ दिली नाही.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बाबेल](../names/babylon.md), [नबूखद्नेस्सर](../names/nebuchadnezzar.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानीएल 01:6-7](rc://*/tn/help/dan/01/06)
* [दानीएल 05:29-31](rc://*/tn/help/dan/05/29)
* [दानीएल 07:27-28](rc://*/tn/help/dan/07/27)
* [यहेज्केल 14:12-14](rc://*/tn/help/ezk/14/12)
* [मत्तय 24:15-18](rc://*/tn/help/mat/24/15)
Strong's: H1840, H1841, G1158