mr_tw/bible/names/carmel.md

24 lines
2.4 KiB
Markdown

# कर्मेल, कर्मेल डोंगर
## तथ्य:
"कर्मेल पर्वत" म्हणजे एका पर्वतरांगाचा भाग, जो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर शारोनच्या मैदानाच्या उत्तरेकडील बाजूस स्थित होते. त्याचे सर्वात उंच शिखर 546 मीटर उंच आहे.
* "कर्मेल" नावाचे एक गाव यहूदामध्ये मृत समुद्राच्या दक्षिणेस स्थित होते.
* श्रीमंत जमीनदार नाबाल आणि त्याची बायको अबीगईल, कर्मेल गावाच्या जवळ राहत होते, जेथे दावीद आणि त्याच्या माणसांनी नाबालच्या मेंढपाळांचे संरक्षण केले.
* कर्मेल डोंगरावर, एलीया बालच्या संदेष्ट्यांना एका परीक्षेत आव्हान दिले; त्याने हे सिद्ध झाले की यहोवा एकच खरा देव आहे.
* तो केवळ एक डोंगर नव्हता हे स्पष्ट करण्यासाठी, "कर्मेल डोंगर" ह्याचे भाषांतर, "कर्मेल पर्वतरांगांवरील डोंगर" किंवा "कर्मेल पर्वतरांगा" असे केले जाऊ शकते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बाल](../names/baal.md), [एलीया](../names/elijah.md), [मृत समुद्र](../names/judah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 18:18-19](../names/saltsea.md)
* [1 शमुवेल 15:12-13](rc://*/tn/help/1ki/18/18)
* [यिर्मया 46:18-19](rc://*/tn/help/1sa/15/12)
* [मीखा 07:14-15](rc://*/tn/help/jer/46/18)
Strong's: H3760, H3761, H3762