mr_tw/bible/names/canaan.md

33 lines
3.5 KiB
Markdown

# कनान, कनानी
## तथ्य:
कनान हा हामचा मुलगा होता, जो नोहाच्या मुलांपैकी एक होता. कनानी हे लोक कनान चे वंशज होते.
* "कनान" किंवा "कनानची भूमी" हे शब्द यार्देन नदी आणि भूमध्य समुद्र ह्यांच्यामधील जमिनीला संदर्भित करतात. दक्षिणेस हे मिसरच्या सीमेपर्यंत आणि उत्तरेस अरामाच्या सीमेपर्यंत पसरले होते.
* या भूमीत कनानी तसेच इतर अनेक लोकसमूहांनी वास्तव्य केले होते.
* देवाने कनानची भूमी अब्राहमाला आणि त्याच्या वंशजांना इस्राएली लोकांना देण्याचे वचन दिले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [हाम](../names/ham.md), [वचनदत्त भूमी](../kt/promisedland.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 13:19-20](rc://*/tn/help/act/13/19)
* [निर्गम 03:7-8](rc://*/tn/help/exo/03/07)
* [उत्पत्ति 09:18-19](rc://*/tn/help/gen/09/18)
* [उत्पत्ति 10:19-20](rc://*/tn/help/gen/10/19)
* [उत्पत्ति 13:5-7](rc://*/tn/help/gen/13/05)
* [उत्पत्ति 47:1-2](rc://*/tn/help/gen/47/01)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[04:05](rc://*/tn/help/obs/04/05)__ त्याने आपली पत्नी साराय, व सर्व नोकरचाकरासहीत मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन अब्राम देवाने दाखविलेल्या __कनान__ देशात जायला निघाला.
* __[04:06](rc://*/tn/help/obs/04/06)__ __कनान__ देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या वंशजांना वतन म्हणुन देईन.
* __[04:09](rc://*/tn/help/obs/04/09)__ तुझ्या वंशजांना मी __कनान__ देश देईल.”
* __[05:03](rc://*/tn/help/obs/05/03)__ मी तुला व तुझ्या वंशजांस __कनान__ देश देईल व मी त्यांचा निरंतरचा देव होईन.
* __[07:08](rc://*/tn/help/obs/07/08)__ त्यानंतर वीस वर्षांनी __कनानामध्ये__ असणा-या आपल्या घरी, याकोब आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.
Strong's: H3667, H3669, G2581, G5478