mr_tw/bible/names/caesarea.md

29 lines
3.1 KiB
Markdown

# कैसरीया, फिलीप्पाच्या कैसरीया
## तथ्य:
कैसरीया हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील महत्वाचे शहर होते, जे कर्मेल पर्वतापासून सुमारे 39 किलोमीटर अंतरावर होते. फिलीप्पाच्या कैसरीया हे शहर इस्राएलाच्या उत्तरपूर्व भागामध्ये, हर्मोन पर्वताजवळ स्थित होते.
* या शहरांचे नाव कैसर, जो रोमी साम्राज्यावर राज्य करीत होता, त्याच्यासाठी ठेवले होते.
* येशूच्या जन्माच्या काळी, किनाऱ्यावरील कैसरीया हे यहुदियाच्या रोमी प्रांताची राजधानी बनले.
* प्रेषित पेत्राने परराष्ट्रीयांना प्रथम कैसरीयामध्ये संदेश दिला.
* पौल कैसरीया पासून तार्ससास गेला, आणि त्याच्या दोन सुवार्ता प्रसाराच्या यात्रेदरम्यान तो या शहरातून देखील गेला.
* सुरीयामधील फिलीप्पाच्या कैसरीया या भागाच्या सभोवताली येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रवास केला. दोन्ही शहरांचे नाव हेरोद फिलिप्प यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [कैसर](../names/caesar.md), [परराष्ट्रीय](../kt/gentile.md), [समुद्र](../names/mediterranean.md), [कर्मेल](../names/carmel.md), [हर्मोन पर्वत](../names/mounthermon.md), [रोम](../names/rome.md), [तार्सस](../names/tarsus.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 9:30](rc://*/tn/help/act/09/28)
* [प्रेषितांची कृत्ये 10:1-2](rc://*/tn/help/act/10/01)
* [प्रेषितांची कृत्ये 25:1](rc://*/tn/help/act/25/01)
* [प्रेषितांची कृत्ये 25:14](rc://*/tn/help/act/25/13)
* [मार्क 8:27](rc://*/tn/help/mrk/08/27)
* [मत्तय 16:13-16](rc://*/tn/help/mat/16/13)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग्स : जी2542, जी5376