mr_tw/bible/names/caesar.md

29 lines
3.2 KiB
Markdown

# कैसर
## तथ्य:
"कैसर" हा शब्द एक नाव किंवा शीर्षक आहे, ज्याचा उपयोग रोमी साम्राज्याच्या अनेक शासकांनी केला. * पवित्र शास्रामध्ये, या नावाचा संदर्भ तीन वेगवेगळ्या रोमी शासकांशी येतो.
* ज्या पहिल्या रोमी शासकाचे नाव कैसर होते तो "औगुस्त कैसर" होता, तो जेंव्हा येशूचा जन्म झाला त्यावेळी शासन करीत होता.
* सुमारे तीन वर्षानंतर, जेंव्हा बाप्तिस्मा करणारा योहान उपदेश करीत होता, त्यावेळी तीबिर्य कैसर हा रोमी साम्राज्याचा शासक होता.
* जेंव्हा येशूने लोकांना सांगितले की, जे कैसराचे ते कैसरला द्या आणि जे देवाचे ते देवाला द्या, तेंव्हासुद्धा तीबिर्य कैसर हा रोमवर शासन करीत होता.
* जेंव्हा पौलाने कैसराजवळ याचना केली, ह्याचा संदर्भ रोमी सम्राट, नेरो ह्याच्याशी होता, त्याला सुद्धा "कैसर" हे शीर्षक देण्यात आले होते.
* जेंव्हा "कैसर" ह्याचा उपयोग स्वतः शीर्षक म्हणून होत असेल तर, त्याचे भाषांतर: "सम्राट" किंवा "रोमी शासक" असे केले जाऊ शकते.
* कैसर औगुस्त किंवा तीबिर्य कैसर या नावामध्ये, "कैसर" अशा प्रकारे लिहायला हवे की, राष्ट्रीय भाषेत त्याला लिहिता येईल.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [राजा](../other/king.md), [पौल](../names/paul.md), [रोम](../names/rome.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 25:6-8](rc://*/tn/help/act/25/06)
* [लुक 02:1-3](rc://*/tn/help/luk/02/01)
* [लुक 20:23-24](rc://*/tn/help/luk/20/23)
* [लुक 23:1-2](rc://*/tn/help/luk/23/01)
* [मार्क 12:13-15](rc://*/tn/help/mrk/12/13)
* [मत्तय 22:15-17](rc://*/tn/help/mat/22/15)
* [फिलीप्पेकरास पत्र 04:21-23](rc://*/tn/help/php/04/21)
Strong's: G2541