mr_tw/bible/names/bathsheba.md

33 lines
3.5 KiB
Markdown

# बथशेबा
## तथ्य:
बथशेबा ही दाविद राजाच्या सैन्यातील एक सैनिक उरीया याची पत्नी होती. उरीया मरण पावल्यानंतर बथशेबा दाविदाची पत्नी आणि शलमोनाची आई बनली.
* दावीदाने बथशेबेशी तिचे उरीयाशी लग्न झाले असतानाही व्यभिचार केला.
* जेव्हा बथशेबा दाविदापासून त्याच्या बाळाची गर्भवती झाली तेव्हा दाविदाने उरीयाला लढाईत मारले जाऊ दिले.
* नंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले आणि तिने त्यांच्या मुलास जन्म दिला.
* दाविदाला त्याच्या पापाबद्दलची शिक्षा म्हणून परमेश्वराने त्या मुलाचा जन्म झाल्यापासून अनेक दिवसांनंतर त्याचा मृत्यू घडवून आणला.
* नंतर, बथशेबाने आणखी एका मुलाला शलमोनाला जन्म दिला जो मोठा होऊन दाविदा नंतर राजा झाला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [दावीद](../names/david.md), [शलमोन](../names/solomon.md), [उरिया](../names/uriah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 03:4-5](rc://*/tn/help/1ch/03/04)
* [1 राजे 01:11-12](rc://*/tn/help/1ki/01/11)
* [2 शमुवेल 11:2-3](rc://*/tn/help/2sa/11/02)
* [स्तोत्र 051:1-2](rc://*/tn/help/psa/051/001)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[17:10](rc://*/tn/help/obs/17/10)__ एके दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना, त्याने आपल्या राजमहालातून एक सुंदर स्त्री स्नान करीत असताना पाहिली. तिचे नाव __बथशेबा__ होते.
* __[17:11](rc://*/tn/help/obs/17/11)__ काही काळानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविदास पाठविला.
* __[17:12](rc://*/tn/help/obs/17/12)__ __बथशेबाचा__ पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता.
* __[17:13](rc://*/tn/help/obs/17/13)__ उरीया मेल्यानंतर दाविदाने __बथशेबाशी__ लग्न केले.
* __[17:14](rc://*/tn/help/obs/17/14)__ नंतर दाविद व __बथशेबा__ यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.
Strong's: H1339