mr_tw/bible/names/balaam.md

28 lines
3.4 KiB
Markdown

# बलाम
## तथ्य:
बलाम हा मूर्तिपूजक संदेष्टा होता, ज्याला बालाक राजाने इस्राएल राष्ट्राला शाप देण्याकरता भाड्याने नियुक्त केले, त्यावेळी इस्राएल लोक मवाबाच्या उत्तरेस असलेल्या यार्देन नदीच्या जवळ तळ देऊन कनानमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत होते.
* बलाम हा पथोर नगराचा रहिवाशी होता, जे फरात नदीच्या काठी, जवळपास मवाबापासून 400 मैल दूर अंतरावर वसलेले होते.
* मिद्यानी राजा, बालाक, इस्राएल लोकांच्या संख्येला आणि शक्तीला खूप घाबरला होता, म्हणून त्याने बलामाला इस्राएल लोकांना शाप देण्यासाठी नियुक्त केले.
* जसा बलाम इस्राएलाकडे प्रवासासाठी निघाला, परमेश्वराचा एक दूत त्याच्या रस्त्यामध्ये उभा राहिला म्हणून बलामाची गाढवी थांबली. परमेश्वराने बालामाच्या गाढवीला बलामाशी बोलण्याची क्षमता दिली.
* परमेश्वराने बलामाला इस्राएल लोकांस शाप देण्याची परवानगी दिली नाही, त्याउलट परमेश्वराने बलामास त्यांना आशीर्वाद देण्याची आज्ञा केली.
* नंतर मात्र, बलामाने इस्राएल लोकांना बाल-पौराची उपासना करण्यास प्रभावित करून त्यांच्यावर दुष्टता आणली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [आशीर्वाद](../kt/bless.md), [कनान](../names/canaan.md), [शाप](../kt/curse.md), [गाढवी](../other/donkey.md), [फरात नदी](../names/euphrates.md), [यार्देन नदी](../names/jordanriver.md), [मिद्यान](../names/midian.md), [मवाब](../names/moab.md), [पौर](../names/peor.md)).
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 पेत्र 2:16](rc://*/tn/help/2pe/02/15)
* [अनुवाद 23:3-4](rc://*/tn/help/deu/23/03)
* [यहोशवा 13:22-23](rc://*/tn/help/jos/13/22)
* [गणना 22:5](rc://*/tn/help/num/22/05)
* [प्रकटीकरण 2:14](rc://*/tn/help/rev/02/14)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H1109, G09030