4.7 KiB
4.7 KiB
बाबेल, बाबेलास, बाबेली
तथ्य:
बाबेल हे शहर बाबेलच्या प्राचीन भागाची राजधानी होते, जे बाबेल साम्राज्याचा भाग होते.
- बाबेल हे फरात नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर होते. शेकडो वर्षापूर्वी याच भागात बाबेलचा बुरूज बांधला गेला होता.
- कधीकधी “बाबेल” हा शब्द संपूर्ण बाबेल साम्राज्याला सूचित करतो. उदाहरणार्थ, “बाबेलचा राजा” याने केवळ शहरावरच नव्हे तर संपूर्ण साम्राज्यावर राज्य केले.
- बाबेलाचे लोक शक्तिशाली लोक होते ज्यांनी यहूदाच्या राज्यावर आक्रमण केले आणि 70 वर्षांपर्यंत लोकांना बाबेलमध्ये बंदिवान म्हणून ठेवले.
- या प्रांताच्या भागाला "खास्द्यांचा देश" आणि तिथल्या लोकांना "खास्दी" म्हणून ओळखण्यात आले. याचा परिणाम म्हंणून "खास्दी" हा शब्द वारंवार बाबेलला संदर्भित किंवा सूचित करण्यासाठी वापरला जातो. (पहा: सिनेकडॉक)
(हे सुद्धा पाहा: बाबेल, खास्दी, यहूदा, नबुखद्नेस्सर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 इतिहास 9:1
- 2 राजे 17:24-26
- प्रेषितांची कृत्ये 7:43
- दानीएल 1:2
- यहेज्केल 12:13
- मत्तय 1:11
- मत्तय 1:17
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 20:6 सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्राएल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.
- 20:7 परंतु काही वर्षां नंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुध्द बंड पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहूदाच्या राज्यावर चढाई केली. त्यांनी यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला व शहरातील व मंदिरातील सर्व संपती घेऊन गेले.
- 20:9 नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.
- 20:11 त्यानंतर सुमारे सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: एच3778, एच3779, एच8152, एच894, एच895, एच896, जी8970