mr_tw/bible/names/azariah.md

25 lines
2.8 KiB
Markdown

# अजऱ्या
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये अजऱ्या नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
* एक अजऱ्याला त्याच्या बाबेलमधील नावाने म्हणजेच अबेदनगो या नावाने चांगले ओळखले जाते. तो यहूदातील बऱ्याच इस्राएलांपैकी एक होता. ज्यांना नबुखदनेस्सरच्या सैन्याने पकडले आणि बाबेलमध्ये राहायला नेले. अजऱ्या व त्याचे सहकारी इस्राएली हनन्या व मीशाएल यांनी बाबेलच्या राजाची उपासना करण्यास नकार दिला, म्हणून त्याने त्यांना एका भयानक धगधगणाऱ्या भट्टीत दंड म्हणून फेकून दिले. परंतु परमेश्वराने त्यांना वाचवले आणि त्यांना काहीही इजा झाली नाही.
* यहूदाचा राजा उज्जीया सुद्धा "अजऱ्या" म्हणून ओळखण्यात आले.
* दुसरा अजऱ्या हा जुन्या करारामध्ये महायाजक होता.
* संदेष्टा यिर्मया याच्या काळात अजऱ्या नावाच्या एका मनुष्याने इस्राएली लोकांना त्यांची जन्मभूमी सोडुन, देवाची आज्ञा मोडण्यास चुकीने उद्युक्त केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हेही पाहा: [बाबेल](../names/babylon.md), [दानीएल](../names/daniel.md), [हनन्या](../names/hananiah.md), [मिशाएल](../names/mishael.md), [यिर्मया](../names/jeremiah.md), [उज्जीया](../names/uzziah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 02:36-38](rc://*/tn/help/1ch/02/36)
* [1 राजे 04:1-4](rc://*/tn/help/1ki/04/01)
* [2 इतिहास 15:1-2](rc://*/tn/help/2ch/15/01)
* [दानीएल 01:6-7](rc://*/tn/help/dan/01/06)
* [यिर्मया 43:1-3](rc://*/tn/help/jer/43/01)
Strong's: H5838