mr_tw/bible/names/asherim.md

24 lines
3.2 KiB
Markdown

# अशेरा, अशेरा देवीचे स्तंभ, अष्टोरेथ
## व्याख्या:
अशेरा ही एक देवीचे नाव होते जीची जुन्या करारानुसार कनानी लोकांच्या गटाने पूजा केली होती. "अष्टोरेथ" हे "अशेरा" चे दुसरे नाव असू शकते किंवा ते एखाद्या वेगळ्या देवीचे नाव असू शकते जे अतिशय समान होते.
* "अशेरा देवीचे स्तंभ" हा शब्द त्या देवीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बनविलेल्या लाकडी प्रतिमा किंवा कोरीव झाडे यांच्याशी आहे.
* अशेरा देवीचे स्तंभ बहुतेकदा खोट्या देवता बालच्या वेद्याजवळ स्थापन करण्यात आले होते, ज्याला अशेराचे पती म्हटले जाते. काही गटांनी बालची सूर्यदेवता म्हणून आणि अशेरा किंवा अष्टोरेथची चंद्रदेवता म्हणून पूजा केली.
* परमेश्वराने इस्राएलांना अशेरा देवीच्या सर्व खोट्या प्रतिमा नष्ट करण्याची आज्ञा दिली.
* गिदोन, आसा राजा आणि योशीया राजा यांसारख्या काही इस्राएली नेत्यांनी परमेश्वराची आज्ञा मानली आणि या मूर्तींचा नाश करण्यासाठी लोकांना नेतृत्व केले.
* पण, शलमोन राजा, मनश्शे राजा आणि अहाब राजा यांसारख्या इतर इस्राएली नेत्यांनी लोकांना अशेरा देवीच्या स्तंभांतून मुक्त केले नाही आणि त्यांनी लोकांना मूर्तींची पूजा करण्यास प्रभावित केले.
(हे सुद्धा पहा: [खोटे देव](../kt/falsegod.md), [बाल](../names/baal.md), [गिदोन](../names/gideon.md), [प्रतिमा](../other/image.md), [शलमोन](../names/solomon.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 राजे 18:4-5](rc://*/tn/help/2ki/18/04)
* [2 राजे 21:1-3](rc://*/tn/help/2ki/21/01)
* [यशया 27:9](rc://*/tn/help/isa/27/09)
* [शास्ते 03:7-8](rc://*/tn/help/jdg/03/07)
* [मीखा 05:12-15](rc://*/tn/help/mic/05/12)
Strong's: H842, H6252, H6253