mr_tw/bible/names/aram.md

30 lines
3.4 KiB
Markdown

# अराम, अरामी,
## व्याख्या:
जुन्या करारांमध्ये अराम नावाचे दोन पुरुष होते. हे कनान देशाच्या ईशान्य भागातील प्रांताचे देखील नाव होते, जिथे आधुनिक काळातील सीरिया स्थित आहे.
* अराममधील रहिवाशांना "अरामी" म्हणून ओळखले जायचे आणि ते "अरामी" भाषा बोलायचे. येशू आणि त्याच्या काळातील इतर यहुदी देखील अरामी भाषेत बोलायचे.
* शेमच्या मुलातील एकाचे नाव अराम होते. अजून एक अराम नावाचा एक मनुष्य होता जो रीबकाचा चुलतभाऊ होता. हे संभाव्य आहे की अराम प्रांताचे नाव या दोन मनुष्यांपैकी एकाच्या नावावरून ठेवण्यात आले.
* अरम नंतर त्याचे ग्रीक नाव "सीरिया" या नावाने ओळखले जाऊ लागले.
* "पदन अराम" या शब्दाचा अर्थ "अरामाचे मैदान" आहे आणि हे मैदान अरामच्या उत्तरी भागात वसलेले होते.
* अब्राहामाचे काही नातेवाईक "पदन अराम" येथे स्थित असलेल्या हारान शहरात राहत होते.
* जुना करारामध्ये, काहीवेळा "अराम" आणि "पदन अराम" या शब्दांचा संदर्भ एकाच प्रांताशी आहे.
* "अराम नहराईम" या शब्दाचा अर्थ "दोन नद्यांचा अराम" असा होऊ शकतो. हा प्रांत मेसोपोटेमियाच्या उत्तरेकडील भागात आणि "पदन अराम" च्या पूर्वेस होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [मेसोपोटेमिया](../names/mesopotamia.md), [पदन अराम](../names/paddanaram.md), [रिबका](../names/rebekah.md), [शेम](../names/shem.md), [सीरिया](../names/syria.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 01:17-19](rc://*/tn/help/1ch/01/17)
* [2 शमुवेल 08:5-6](rc://*/tn/help/2sa/08/05)
* [आमोस 01:5](rc://*/tn/help/amo/01/05)
* [यहेज्केल 27:16-18](rc://*/tn/help/ezk/27/16)
* [उत्पत्ति 31:19-21](rc://*/tn/help/gen/31/19)
* [होशे 12:11-12](rc://*/tn/help/hos/12/11)
* [स्तोत्र 060:1](rc://*/tn/help/psa/060/001)
Strong's: H758, H763, G689