mr_tw/bible/names/arabia.md

27 lines
2.9 KiB
Markdown

# अरबस्तान, अरब, अरबी
## तथ्य:
अरब हे जगातील सर्वात मोठे द्वीपकल्प आहे, जे सुमारे 3,000,000 चौरस किलोमीटर व्यापत आहे. हे इस्राएलच्या दक्षिणपूर्व स्थित आहे आणि ते लाल समुद्र, अरबी समुद्र आणि पारसाच्या खाडीच्या सीमेवर आहे.
* "अरब" या शब्दाचा उपयोग अरबस्तानात राहणारा किंवा अरबस्तानशी जोडलेल्या एखाद्याच्या संदर्भात केला जातो.
* अरबस्तानमध्ये राहणारे सर्वात जुने लोक शेमची नातवंडे होती. अरबस्तानच्या आधीच्या रहिवाश्यांमध्ये अब्राहामचा मुलगा इश्माएल आणि त्याचे वंशज तसेच एसावचे वंशज यांचा समावेश होतो.
* वाळवंटी प्रदेश जेथे 40 वर्षांपर्यंत इस्राएली लोक भटकत होते ते अरबियामध्ये होते.
* येशूवर विश्वास ठेवल्यानंतर प्रेषित पौलाने अरबियाच्या वाळवंटात काही वर्षे घालवली.
* गलतीयातील ख्रिस्ती लोकांना लिहिलेल्या आपल्या पत्रात, पौलाने उल्लेख केला की सिनाय पर्वत अरबस्तानमध्ये स्थित होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [एसाव](../names/esau.md), [गलतीया](../names/galatia.md), [इश्माएल](../names/ishmael.md), [शेम](../names/shem.md), [सिनाय](../names/sinai.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 राजे 10:14-15](rc://*/tn/help/1ki/10/14)
* [प्रेषितांची कृत्ये 02:8-11](rc://*/tn/help/act/02/08)
* [गलतीकरांस पत्र 01:15-17](rc://*/tn/help/gal/01/15)
* [गलतीकरांस पत्र 04:24-25](rc://*/tn/help/gal/04/24)
* [यिर्मया 25:24-26](rc://*/tn/help/jer/25/24)
* [नहेम्या 02:19-20](rc://*/tn/help/neh/02/19)
Strong's: H6152, H6153, H6163, G688, G690