mr_tw/bible/names/amorite.md

28 lines
3.6 KiB
Markdown

# अमोरी, अमोऱ्यांचा
## तथ्य:
अमोरी लोकांचा एक शक्तिशाली गट होता, जो नूहचा नातू कनानहून निघाला होता.
* त्यांच्या नावाचा अर्थ "एक उंच" असा होतो, ज्याचा संदर्भ ते लोक डोंगराळ प्रदेशात जाऊन वास्तव्य करीत किंवा ते फार उंच असल्याचे ज्ञात होण्याशी आहे.
* अमोरी लोक यार्देन नदीच्या दोन्ही बाजूच्या प्रदेशात राहात होते. आय शहरामध्ये अमोऱ्यांचे वास्तव्य होते.
* परमेश्वर "अमोऱ्यांच्या पापांचा" संदर्भ देतो, ज्यामध्ये खोट्या देवांची उपासना आणि पापी व्यवहारांचा समावेश होता.
* यहोशवाने अमोऱ्यांचा विनाश करण्यासाठी इस्राएल लोकांचे नेतृत्व केले, कारण परमेश्वराने त्याला तशी आज्ञा दिली होती.
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [आमोस 02:9-10](rc://*/tn/help/amo/02/09)
* [यहेज्केल 16:1-3](rc://*/tn/help/ezk/16/01)
* [उत्पत्ति 10:15-18](rc://*/tn/help/gen/10/15)
* [उत्पत्ति 15:14-16](rc://*/tn/help/gen/15/14)
* [यहोशवा 09:9-10](rc://*/tn/help/jos/09/09)
## पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:
* __[15:07](rc://*/tn/help/obs/15/07)__ काही काळानंतर, कनानामधील इतर लोकगटाच्या राजांनी, __अमोरी__ लोकांनी, ऐकले की गिबोनी लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला.
* __[15:08](rc://*/tn/help/obs/15/08)__ पहाटेच त्यांनी __अमोरी__ सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला व त्यांच्यावर हल्ला केला.
* __[15:09](rc://*/tn/help/obs/15/09)__ त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने __अमोरी__ सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक __अमोरी__ मरण पावले.
* __[15:10](rc://*/tn/help/obs/15/10)__ देवाने सुद्धा सूर्यास आकाशात एका जागी स्थिर राहाण्याची आज्ञा केली कारण इस्राएलांना __अमो-यांचा__ पुर्णपणे नाश करण्यास वेळ मिळावा.
Strong's: H567,