mr_tw/bible/names/amalekite.md

25 lines
3.2 KiB
Markdown

# अमालेक, अमालेकी
## तथ्य:
अमालेकी एक भटक्या विमुक्त लोकांचा समूह होता जो कनानच्या दक्षिणेकडील भागात, नेगेव वाळवंटापासून अरब देशापर्यंत पसरला होता. या लोकांचा समूह अमालेक जो एसावचा नातू त्या पासून खाली आला होता
* ज्यावेळी पासून इस्राएल लोक कनान देशात राहण्यास आले त्यावेळी पासून अमालेकी लोक त्याचे कडवट शत्रू होते.
* कधीकधी "अमालेक" हा शब्द सर्व अमालेकींना सूचित करण्यासाठी लाक्षणिक अर्थाने वापरला जातो. (पहा: [सिनेकडॉच](rc://*/ta/man/translate/figs-synecdoche))
* अमालेकी लोकांविरुद्धच्या एका लढाईत, जेव्हा मोशेने हात उंचावत होता तेव्हा इस्राएली लोकांची सरशी होत होती. जेव्हा तो थकले आणि हात खाली आले तेव्हा ते हारू लागले. जोपर्यंत इस्राएली सैन्याने अमालेकी लोकांना नष्ट केले नाही तोपर्यंत अहरोन आणि हूरने मोशेला त्याचे हात वर उंच ठेवण्यास मदत केली.
* शौल राजा आणि दावीद राजा या दोघांनी ही अमालेकी लोकांविरुद्ध लष्करी मोहीम चालवली.
* अमालेकी लोकांवर एक विजय मिळवल्यानंतर, शौलांनी काही लूट केली आणि अमालेकी राजाला ठार केले नाही. असे करून त्याला देवाने जी आज्ञा दिली होती ती त्याने मानिली नाही.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा [अरेबिया](../names/arabia.md), [दावीद](../names/david.md), [एसाव](../names/esau.md), [नेगेव](../names/negev.md), [शौल](../names/saul.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 04:42-43](rc://*/tn/help/1ch/04/42)
* [2 शमुवेल 01:8-10](rc://*/tn/help/2sa/01/08)
* [निर्गम 17:8-10](rc://*/tn/help/exo/17/08)
* [गणना 14:23-25](rc://*/tn/help/num/14/23)
Strong's: H6002, H6003