mr_tw/bible/names/ahab.md

29 lines
3.0 KiB
Markdown

# अहाब
## तथ्य:
अहाब हा एक अत्यंत दुष्ट राजा होता ज्याने 875 ते 854 इ.स.पूर्व काळातील उत्तरेकडील इस्राएल राष्ट्रावर राज्य केले.
* अहाब राजाने इस्राएलाच्या लोकांना खोट्या देवांची उपासना करण्यास प्रभावित केले.
* एलीया संदेष्टा याने अहाब याच्याशी सामना केला आणि त्याने त्याला सांगितले की अहाबामुळे इस्राएल लोकांनी केलेल्या पापांबद्दल साडेतीन वर्षे भयंकर दुष्काळ येईल.
* अहाब आणि त्याची पत्नी ईजबेल यांनी इतर अनेक वाईट गोष्टी केल्या, ज्यात त्यांनी त्यांचा अधिकार वापरून निरपराध लोकांना मारण्याचा समावेश आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बाल](../names/baal.md), [एलीया](../names/elijah.md), [ईजबेल](../names/jezebel.md), [इस्राएलाचे राज्य](../names/kingdomofisrael.md), [यहोवा](../kt/yahweh.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 राजे 18:1-2](rc://*/tn/help/1ki/18/01)
* [1 राजे 20:1-3](rc://*/tn/help/1ki/20/01)
* [2 इतिहास 21:6-7](rc://*/tn/help/2ch/21/06)
* [2 राजे 09:7-8](rc://*/tn/help/2ki/09/07)
## पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:
* जेंव्हा __अहाब__ इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. __अहाब__ हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.
* __अहाब__ व त्याचे सैन्य एलीयास शोधत होते, पण त्यांना तो सापडला नाही.
* साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयास इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची __अहाब__ राजासमोर घोषणा करावयास सांगितली.
Strong's: H256