mr_tw/bible/names/adam.md

4.1 KiB

आदाम

तथ्य:

आदाम पहिला माणूस होता ज्याला परमेश्वराने निर्माण केले. तो आणि त्याची पत्नी हव्वा देवाच्या प्रतिरुपात बनविले.

  • देवाने आदामाला मातीतून निर्माण केले आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला.
  • आदामाचे नाव "लाल माती" किंवा "जमीन" या इब्री शब्दासारखाच आहे.
  • "आदाम" हे नाव "मानवजाती" किंवा "मानवी स्थिती" या जुन्या करारांतील शब्दांप्रमाणे आहे.
  • सर्व लोक आदाम आणि हव्वा यांचे वंशज आहेत.
  • आदाम आणि हव्वा यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली. यामुळे ते परमेश्वरापासून विभक्त झाले आणि जगात पाप व मरण आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: मृत्यू, वंशज, हव्वा, देवाची प्रतिरुप, जीवन)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 01:09 मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण करू".
  • 01:10 या मनुष्याला आदाम हे नाव देण्यात आले. देवाने आदामाला राहण्यासाठी एक बाग निर्माण केली व त्याची काळजी घेण्यासाठी त्याला तेथे ठेवले.
  • 01:12 मग देव बोलला, “मनुष्य एकटा असणे हे बरे नाही". परंतु प्राण्यांमधून आदामाचा योग्य जोडीदार होऊ शकत नाही.
  • 02:11 मग देवाने आदाम व हव्वा यांना चर्मवस्त्रे करुन घातली.
  • 02:12 म्हणून देवाने आदाम व हव्वा यांना सुंदर बागेतून घालवून दिले.
  • 49:08 जेव्हा आदाम व हव्वा यांनी पाप केले, तेव्हा ते सर्व मानवजातीमध्ये पसरले.
  • 50:16 आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले व देवाने त्यास शाप दिला व त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0120, G00760