mr_tw/bible/kt/wrath.md

3.5 KiB

क्रोध, संताप

व्याख्या:

क्रोध हा एक तीव्र राग आहे जो कधीकधी दीर्घकाळ राहतो. बायबलमध्ये लोक आणि देव या दोघांना तीव्र राग येत असल्याचे वर्णन केले आहे. देवाचा "क्रोध" याबद्दल बोलत असताना, हे सुनिश्चित करा की या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द किंवा वाक्यांश क्रोधाच्या पापी वृत्तीला सदर्भित करत नाही (जे एखाद्या मानवी व्यक्तीसाठी खरे असू शकते).

  • बायबलमध्ये, "क्रोध" हा शब्द सहसा देवाच्या पापाबद्दल योग्य न्यायास आणि त्याच्या विरोधात बंड करणाऱ्या लोकांच्या शिक्षेस संदर्भित करतो.
  • "देवाचा क्रोध" त्याच्या न्यायाच्या आणि पापाबद्दलच्या शिक्षेला देखील संदर्भित करु शकते.
  • जे लोक आपल्या पापाचा पश्चाताप करत नाहीत त्यांच्यासाठी देवाचा क्रोध हा योग्य दंड आहे.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "तीव्र राग" किंवा "नितीपुर्वक न्याय" किंवा "क्रोध" ह्यांचा समावेश होतो.
  • देवाचा क्रोध न्यायी आणि पवित्र आहे. देवाच्या क्रोधाबद्दल बोलताना, या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द किंवा वाक्यांश पापी मानवी संतापाचा संदर्भ देत नाही याची खात्री करा.

(हे देखील पाहा: न्यायाधीश, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0639, एच2197, एच2528, एच2534, एच2740, एच3707, एच3708, एच5678, एच7107, एच7109, एच7110, एच7265, एच7267, जी23720, जी37090, जी39490, जी39500