38 lines
4.7 KiB
Markdown
38 lines
4.7 KiB
Markdown
# काम, कामे, कृत्ये
|
||
|
||
## व्याख्या:
|
||
|
||
"कार्य" हा शब्द सामान्यत: एकतर काहीतरी साध्य करण्यासाठी खर्च करण्याच्या प्रयत्नास किंवा त्या क्रियेच्या परिणामास सूचित करतो. "कामे" हा शब्द सामान्यत: संपूर्ण क्रियांना सूचित करतो (म्हणजेच ज्या गोष्टी केल्या आहेत किंवा केल्या पाहिजेत).
|
||
|
||
* पवित्र शास्त्रात हे शब्द सामान्यत: देव आणि मानवाच्या संदर्भात वापरले जातात.
|
||
* जेव्हा देवाच्या संदर्भात वापरली जाते, तेव्हा पवित्र शास्त्रीतील "कार्य" ही संज्ञा बहुतेक वेळा विश्व निर्माण करण्याच्या किंवा आपल्या लोकांना (एकतर शत्रूंकडून, पापापासून किंवा दोन्हीपासून) वाचविण्याच्या देवाच्या कृतीचा संदर्भ देते.
|
||
* देवाची कामे तो करत असलेल्या किंवा केलेल्या सर्व गोष्टींचा संदर्भ घेतात, ज्यात जग निर्माण करणे, पाप्यांना वाचविणे, सर्व सृष्टीच्या गरजा भागविणे आणि संपूर्ण विश्व जागृत ठेवणे यांचा समावेश आहे.
|
||
* एखादी व्यक्तीने केलेली कामे किंवा कृती एकतर चांगली किंवा वाईट असू शकते.
|
||
|
||
## भाषांतरातील सूचना:
|
||
|
||
* "कामे" या संज्ञेचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग "कृत्ये" किंवा "कृती" किंवा "पूर्ण केलेल्या गोष्टी"
|
||
* देवाचे "कामे" किंवा "कृत्ये" किंवा "त्याच्या हातांचे कार्य" यांचे भाषांतर "चमत्कार" किंवा "अद्भुत कृत्ये" किंवा "देव करतो त्या गोष्टी" असे म्हणून केले जाऊ शकते.
|
||
* "देवाचे कार्य" या अभिव्यक्तीचे भाषांतर "देव करीत असलेल्या गोष्टी" किंवा "देव करीत असलेले चमत्कार" किंवा "देवाने जे केले आहे ते सर्व" असे म्हणून केले जाऊ शकते
|
||
* "कार्य" हा शब्द “कार्ये” या शब्दाचे एकवचनी रुप असु शकते जसे "प्रत्येक चांगले कार्य" किंवा "प्रत्येक चांगली कृती".
|
||
* जेव्हा देव किंवा इतरांसाठी काम केले जाते तेव्हा त्याचे भाषांतर "सेवा" किंवा "सेवाकार्य" असे म्हणून केले जाऊ शकते
|
||
|
||
(हे देखील पाहा: [फळ](../other/fruit.md), [पवित्र आत्मा](../kt/holyspirit.md), [चमत्कार](../kt/miracle.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [1 योहान 3:12](rc://*/tn/help/1jn/03/12)
|
||
* [प्रेषित 2:8-11](rc://*/tn/help/act/02/08)
|
||
* [दानीएल 4:37](rc://*/tn/help/dan/04/37)
|
||
* [निर्गम 34:10-11](rc://*/tn/help/exo/34/10)
|
||
* [गलती 2:15-16](rc://*/tn/help/gal/02/15)
|
||
* [याकोब 2:17](rc://*/tn/help/jas/02/17)
|
||
* [मत्तय 16:27-28](rc://*/tn/help/mat/16/27)
|
||
* [मीखा 2:7](rc://*/tn/help/mic/02/07)
|
||
* [रोम 3:28](rc://*/tn/help/rom/03/28)
|
||
* [तीत 3:4-5](rc://*/tn/help/tit/03/04)
|
||
|
||
## शब्द माहीती:
|
||
|
||
* स्ट्रोंग: H4399, H4566, H4567, H4611, H4659, H5949, G20410
|