mr_tw/bible/kt/woe.md

32 lines
3.4 KiB
Markdown

# दुःख
## व्याख्या:
"हाय" या शब्दाचा अर्थ मोठ्या संकटाची भावना आहे. हे एक चेतावणी देखील देते की, कोणीतरी गंभीर समस्या अनुभवेल.
* "हाय तुम्हाला" ही अभिव्यक्ती लोकांसाठी, ते त्यांच्या पापांबद्दल शिक्षा म्हणून दुःख अनुभवतील, अशी एक चेतावणी म्हणून येते.
* पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी, विशेषतः भयानक न्याय करण्यावर जोर देण्यासाठी "हाय" हा शब्द परत परत वापरला जातो.
* एक व्यक्ती जो असा म्हणतो "हाय मला" किंवा "माझ्यासाठी हाय" हे गंभीर छळाबद्दल दु:ख व्यक्त करण्याशी आहे.
## भाषांतर सूचना:
* संदर्भावर आधारित, "हाय" या शब्दाचे भाषांतर "महान दुःख" किंवा "खिन्नता" किंवा "अपत्ती" किंवा "अनर्थ" असे केले जाऊ शकते.
* "हाय (शहराच्या नावाला)" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "ह्याला कसे भयंकर होईल (शहराचे नाव)" किंवा "(त्या शहरातील) लोकांना कठोर शिक्षा होईल" किंवा "त्या लोकांना मोठ्या मानाने पीडा होईल" असे केले जाऊ शकते.
* "हाय मला" किंवा "माझ्यासाठी हाय" या अभिव्याक्तींचे भाषांतर "मी किती दुःखी आहे!" किंवा "मी खूप दुःखी आहे" किंवा "हे माझ्यासाठी किती भयानक आहे!" असे केले जाऊ शकते,
* "हाय तुम्हाला" या अभिव्यक्तीचे भाषातंर "तुम्ही अतिशय दुःख सहन कराल" किंवा "तुम्हाला भयंकर त्रास अनुभवायला लागेल" असे केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 13:17-18](rc://*/tn/help/ezk/13/17)
* [हबक्कूक 02:12](rc://*/tn/help/hab/02/12)
* [यशया 31:1-2](rc://*/tn/help/isa/31/01)
* [यिर्मया 45:1-3](rc://*/tn/help/jer/45/01)
* [यहूदाचे पत्र 1:9-11](rc://*/tn/help/jud/01/09)
* [लुक 06:24](rc://*/tn/help/luk/06/24)
* [लुक 17:1-2](rc://*/tn/help/luk/17/01)
* [मत्तय 23:23](rc://*/tn/help/mat/23/23)
## शब्द माहिती
* Strong's: H188, H190, H337, H480, H1929, H1945, H1958, G3759