mr_tw/bible/kt/unleavenedbread.md

33 lines
3.8 KiB
Markdown

# बेखमीर भाकर
## व्याख्या:
"बेखमीर भाकर" या शब्दाचा संदर्भ अशा भाकरीशी आहे, जी किण्व किंवा इतर खमीर न वापरता बनवलेली असते. अशा प्रकारची भाकर फुगत नाही कारण त्याला फुगवण्यासाठी त्याच्यामध्ये खमीर घातलेले नसते.
* जेंव्हा देवाने इस्राएली लोकांना मिसरच्या गुलामगिरीतून मुक्त केले, तेव्हा त्याने त्यांना भाकर फुगण्याची वाट न पाहता लगेच मिसर मधून पळून जाण्यास सांगितले. म्हणून त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये बेखमीर भाकर खाल्ली. तेव्हापासून बेखमीर भाकरीचा उपयोग त्यांचा वार्षिक वल्हांडण सण साजरा करताना केला जातो, जो त्यांना त्या वेळेची आठवण करून देतो.
* कधीकधी खमीर पापाचे चित्र म्हणून वापरले जाते, "बेखमीर भाकर" म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनातून पाप काढून टाकणे, ज्यामुळे देवाला सन्मान मिळावा अशा पद्धतीने जीवन जगता येते.
## भाषांतर सूचना:
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "किण्व नसलेली भाकर" किंवा "सपाट भाकर जी फुगत नाही" असे केले जाऊ शकते.
* आपण "किण्व, खमीर" या शब्दाचे भाषांतर ज्या पद्धतीने करतो, त्या बरोबर या मुद्याचे भाषांतर सुसंगत असल्याचे सुनिश्चित करा.
* काही संदर्भांमध्ये, "बेखमीर भाकर" या शब्दाचा अर्थ "बेखमीर भाकरीचा सन" असा आहे आणि त्याला त्या मार्गाने भाषांतरित केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [भाकर](../other/bread.md), [मिसर](../names/egypt.md), [सन](../other/feast.md), [वल्हांडण](../kt/passover.md), [सेवक](../other/servant.md), [पाप](../kt/sin.md), [किण्व](../other/yeast.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 05:6-8](rc://*/tn/help/1co/05/06)
* [2 इतिहास 30:13-15](rc://*/tn/help/2ch/30/13)
* [प्रेषितांची कृत्ये 12:3](rc://*/tn/help/act/12/03)
* [निर्गम 23:14-15](rc://*/tn/help/exo/23/14)
* [एज्रा 06: 21-22](rc://*/tn/help/ezr/06/21)
* [उत्पत्ति 19:1-3](rc://*/tn/help/gen/19/01)
* [शास्ते 06:21](rc://*/tn/help/jdg/06/21)
* [लेवीय 08:1-3](rc://*/tn/help/lev/08/01)
* [लुक 22:1](rc://*/tn/help/luk/22/01)
## शब्द माहिती
* Strong's: H4682, G106