mr_tw/bible/kt/transgression.md

31 lines
3.4 KiB
Markdown

# उल्लंघन करणे, अपराध
## व्याख्या:
"उल्लंघन" या शब्दाचा अर्थ रेषा ओलांडणे किंवा सीमारेषाचे उल्लंघन करणे. हा शब्द सहसा लाक्षणिक अर्थाने वापरला जातो, म्हणजे आज्ञा, नियम किंवा नैतिक संहिता मोडणे.
* ही संज्ञा "पाप" या शब्दासारखीच आहे, परंतु सामान्यतः इतर लोकांपेक्षा देवाविरूद्धच्या उल्लंघनांचे वर्णन करण्यासाठी अधिक वेळा वापरली जाते.
* "उल्लंघण करणे" या संज्ञेचे वर्णन "रेषा ओलांडणे" असे देखील केले जाऊ शकते, म्हणजे, व्यक्ती आणि इतरांच्या भल्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादा किंवा सीमा ओलांडणे.
## भाषांतर सूचना:
* "उल्लंघन" या शब्दाचे भाषांतर "पाप" किंवा "अवज्ञा करणे" किंवा "बंड करणे" असेही केले जाऊ शकते.
* जर, एखाद्या वचनात किंवा परिच्छेदात "पाप" किंवा "उल्लंघन" किंवा "अतिक्रमण" या अर्थाच्या दोन शब्दांचा उपयोग होत असेल तर, शक्य असल्यास, या शब्दांचे भाषांतर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा. जेव्हा पवित्र शास्त्रात दोन किंवा अधिक एकसारख्या अर्थाच्या शब्दांचा उपयोग एकाच संदर्भामध्ये केला जातो, तेव्हा सहसा त्याचा हेतू जे सांगितले जाते किंवा दाखवले जाते, त्यावर भर देण्याचा असतो.
(पाहा: [समांतरता](rc://*/ta/man/translate/figs-parallelism))
(हे देखील पाहा: [अवज्ञा करणे](../other/disobey.md), [पाप](../kt/sin.md), [उल्लंघन](../kt/trespass.md), [अपराध](../kt/iniquity.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 4:6](rc://*/tn/help/1th/04/03)
* [दानीएल 9:24-25](rc://*/tn/help/dan/09/24)
* [गलतीकरांस पत्र 3:19-20](rc://*/tn/help/gal/03/19)
* [गलतीकरांस पत्र 6:1-2](rc://*/tn/help/gal/06/01)
* [गणना 14:17-19](rc://*/tn/help/num/14/17)
* [स्तोत्र 32:1](rc://*/tn/help/psa/032/001)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H898, H4603, H4604, H6586, H6588, G458, G459, G3845, G3847, G3848, G3928