mr_tw/bible/kt/thetwelve.md

31 lines
2.9 KiB
Markdown

# बारा, अकरा
## व्याख्या:
"बारा" या शब्दाचा संदर्भ बारा मनुष्यांशी आहे, ज्यांना येशूने त्याचे जवळचे शिष्य किंवा प्रेषित होण्यासाठी निवडले. यहुदाने आत्महत्या केल्यावर, त्यांना "अकरा" असे संबोधण्यात आले.
* येशूचे इतर अनेक शिष्य होते, पण "बारा" हे शीर्षक, जे येशूच्या अगदी जवळ होते असा भेद दाखवते.
* या बारा शिष्यांच्या नावाची यादी मत्तय 10, मार्क 3 आणि लुक 6 मध्ये नोंद केलेली आहे.
* येशू स्वर्गामध्ये परत गेल्यानंतर, "अकरा" जणांनी मत्थिया नावाच्या शिष्याला यहुदाच्या जागी प्रेषित होण्यासाठी निवडले. त्यानंतर त्यांना परत "बारा" असे संबोधण्यात आले.
## भाषांतर सूचना:
* अनेक भाषेमध्ये एखादे नाम जोडून असे म्हणणे, "बारा प्रेषित" किंवा "येशूचे बारा जवळचे शिष्य" हे कदाचित स्पष्ट आहे किंवा अधिक स्वाभाविक आहे.
* "अकरा" ह्याचे भाषांतर "येशूचे राहिलेले अकरा शिष्य" असे केले जाऊ शकते.
* काही भाषांतरे, कदाचित ह्याचा एक शीर्षक म्हणून उपयोग केला आहे असे दाखवतील, जसे की, "बारा" आणि "अकरा" आणि ह्याला मोठ्या अक्षरात लिहिण्यास प्राधान्य देतील.
(हे सुद्धा पहा: [प्रेषित](../kt/apostle.md), [शिष्य](../kt/disciple.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 15:5-7](rc://*/tn/help/1co/15/05)
* [प्रेषितांची कृत्ये 06:2](rc://*/tn/help/act/06/02)
* [लुक 09:1](rc://*/tn/help/luk/09/01)
* [लुक 18:31](rc://*/tn/help/luk/18/31)
* [मार्क 10:32-34](rc://*/tn/help/mrk/10/32)
* [मत्तय 10:7](rc://*/tn/help/mat/10/05)
## शब्द माहीती:
* Strong's: G1427, G1733