mr_tw/bible/kt/tetrarch.md

25 lines
2.9 KiB
Markdown

# मांडलिक
## व्याख्या:
"मांडलिक" या शब्दाचा संदर्भ शासकीय अधिकाऱ्याशी आहे, जो रोमी साम्राज्याच्या भागांवर शासन करीत होता. प्रत्येक मांडलिक हा रोमी सम्राटाच्या अधिकाराखाली होता.
* मांडलिक या शीर्षकाचा अर्थ "चार संयुक्त शासकांपैकी एक" असा होतो.
* सम्राट डाईक्लेटीयनच्या साम्राज्यात, रोमन साम्राज्याच्या चार प्रमुख विभागाची सुरवात झाली आणि प्रत्येक मंडलीकाने एका भागावर राज्य केले.
* "महान" हेरोदाचे राज्य, जो येशूच्या जन्माच्या वेळी राजा होता, त्या राज्याचे त्याच्या मृत्युनंतर चार भाग झाले, आणि त्यावर त्याच्या मुलांनी "मांडलिक" किंवा "चौथ्याचे शासक" म्हणून शासन केले.
* प्रत्येक भागामध्ये एक किंवा अधिक छोटे भाग होते, त्याला "प्रांत" असे म्हणत, जसे की गालील किंवा शोमरोन.
* "मांडलिक हेरोद" ह्याचा उल्लेख नवीन करारामध्ये बऱ्याचदा आलेला आहे. तो "हेरोद अंतिपा" या नावाने सुद्धा ओळखला जातो.
* "मांडलिक" या शब्दाचे भाषांतर "प्रादेशिक अधिकारी" किंवा "प्रांताचा शासक" किंवा "शासक" किंवा "अधिकारी" असेही केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [अधिकारी](../other/governor.md), [हेरोद अंतिपा](../names/herodantipas.md), [प्रांत](../other/province.md), [रोम](../names/rome.md), [शासक](../other/ruler.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 3:1-2](rc://*/tn/help/luk/03/01)
* [लुक 9:7](rc://*/tn/help/luk/09/07)
* [मत्तय 14:1-2](rc://*/tn/help/mat/14/01)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग:जी50750, जी50760