mr_tw/bible/kt/test.md

40 lines
5.1 KiB
Markdown

# परीक्षा, पारख, परीक्षा घेणे, अग्नित परिक्षा घेणे
## व्याख्या:
"परीक्षा" या शब्दाचा संदर्भ कठीण किंवा दुःखदायक अनुभवाशी आहे, जो एखाद्या व्यक्तीची ताकद किंवा दुर्बलता प्रकट करतो.
* देव लोकांची परीक्षा घेतो, पण तो त्यांना पाप करण्यासाठी भुरळ पाडत नाही. सैतान, तथापि, पाप करण्यासाठी लोकांना भुरळ पाडतो.
* देव लोकांचे पाप उघड करण्यासाठी काहीवेळा परीक्षेचा उपयोग करतो. एक परीक्षा एखाद्या व्यक्तीला पापापासून वळण्यासाठी आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी मदत करते.
* सोने आणि इतर धातूंची, ते किती शुद्ध आणि मजबूत आहेत हे शोधण्यासाठी आग्निमध्ये परीक्षा घेतली जाते. कसा देव त्याच्या लोकांना पारखण्यासाठी दुःखदायक परिस्थितींचा उपयोग करतो, ह्याचे हे चित्र आहे.
* "परीक्षा ठेवणे" ह्याचा अर्थ "काहीतरी किंवा कोणालातरी त्याची किंमत सिद्ध करण्यासाठी आव्हान करणे" असा होतो.
* देवाची परीक्षा घेणे ह्याच्या संदर्भात, ह्याचा अर्थ त्याच्या दयेचा फायदा घेऊन, आपल्यासाठी त्याला एक चमत्कार घडवून आणण्याचा प्रयत्न करणे असा होतो.
* येशूने सैतानाला सांगितले की देवाची परीक्षा घेणे चुकीचे आहे. तो सर्वसमर्थ, पवित्र देव आहे, जो सर्वांच्या वर आहे.
## भाषांतर सूचना:
* "परीक्षा घेणे" या शब्दाचे भाषांतर "आव्हान देणे" किंवा "अडचणींचा अनुभव करावयास लावणे" किंवा "सिद्ध करणे" असे देखील केले जाऊ शकते.
* "परीक्षा" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "आव्हान" किंवा "अडचणींचा अनुभव" ह्यांचा समावेश होतो.
* "परीक्षे होणे" ह्याचे भाषांतर "चाचणी" किंवा "आव्हान तयार करणे" किंवा "स्वतःला सिद्ध करण्याची सक्ती करणे" असे केले जाऊ शकते.
* देवाची परीक्षा घेण्याच्या संदर्भात, ह्याचे भाषांतर "देवाला त्याचे प्रेम सिद्ध करण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न करणे" असे केले जाऊ शकते.
* काही संदर्भामध्ये, जेव्हा देवा विषय नसतो, तेव्हा "परीक्षा" ह्याचा अर्थ "भुरळ पाडणे" असा होतो.
(हे देखील पाहा: [भुरळ पाडणे](../kt/tempt.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 योहान 4:1](rc://*/tn/help/1jn/04/01)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 5:21](rc://*/tn/help/1th/05/19)
* [प्रेषितांची कृत्ये 15:10](rc://*/tn/help/act/15/10)
* [उत्पत्ति 22:1](rc://*/tn/help/gen/22/01)
* [यशया 7:13](rc://*/tn/help/isa/07/13)
* [याकोबाचे पत्र 1:12](rc://*/tn/help/jas/01/12)
* [विलापगीत 3:40-43](rc://*/tn/help/lam/03/40)
* [मलाखी 3:10](rc://*/tn/help/mal/03/10)
* [मत्तय 1:10](rc://*/tn/help/php/01/09)
* [स्तोत्र 26:1-3](rc://*/tn/help/psa/026/001)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H5254, H5713, H5715, H5749, H6030, H8584, G12420, G12630, G13030, G13820, G19570, G31400, G31410, G31420, G31430, G39840, G43030, G44510, G48280, G60200