mr_tw/bible/kt/tempt.md

39 lines
5.1 KiB
Markdown

# परीक्षा घेणे, मोह
## व्याख्या:
एखाद्याला परीक्षेत पाडणे म्हणजे त्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे करण्यास प्रवृत्त करणे होय.
* एक मोह म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे करण्याची इच्छा असणे.
* लोक त्यांच्या स्वत:च्या पापमय स्वभावामुळे आणि इतर लोकांच्याद्वारे मोहात पडले जातात.
* सैतान लोकांना देवाची आज्ञा मोडण्यास आणि चुकीच्या गोष्टी करून देवाविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतो.
* सैतानाने येशूला मोहात पाडण्याचा आणि त्याला काहीतरी चुकीचे करण्याचा प्रयत्न केला, परंतु येशूने सैतानाच्या सर्व मोहाचा प्रतिकार केला आणि कधीही पाप केले नाही.
* जो कोणी “देवाला मोहात पाडत आहे” तो त्याने काहीतरी चुकीचे करावे असा प्रयत्न करीत नाही, उलट, त्याच्या हट्टी अवज्ञेच या पातळीवर जातो की देवाने त्याला शिक्षा करून प्रतिसाद दिला पाहिजे. याला “देवाची परीक्षा” असेही म्हणतात.
## भाषांतर सूचना:
* "भुरळ पाडणे" या शब्दाचे भाषांतर "पाप करण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणे" किंवा "मोहात पाडणे" किंवा "पाप करण्याची इच्छा निर्माण करण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
* "मोह" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "मोहक गोष्टी" किंवा "एखाद्याला पाप करण्यासाठी मोहात पडणाऱ्या गोष्टी" किंवा "अशा गोष्टी ज्यामुळे काहीतरी चुकीचे करण्याची इच्छा निर्माण होते" असे केले जाऊ शकते.
* "देवाची परीक्षा घेणे" ह्याचे भाषांतर "देवाची परीक्षा बघणे" किंवा "देवाला पारखणे" किंवा "देवाची सहनशीलता बघणे" किंवा "देवाने शिक्षा द्यावी म्हणून कारणीभूत होणे" किंवा "हट्टीपणाने देवाची आज्ञा मोडत राहणे" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [अवज्ञा](../other/disobey.md), [सैतान](../kt/satan.md), [पाप](../kt/sin.md), [परीक्षा](../kt/test.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 3:4-5](rc://*/tn/help/1th/03/04)
* [इब्री 4:15](rc://*/tn/help/heb/04/14)
* [याकोबाचे पत्र 1:13](rc://*/tn/help/jas/01/12)
* [लुक 4:2](rc://*/tn/help/luk/04/01)
* [लुक 11:4](rc://*/tn/help/luk/11/03)
* [मत्तय 26:41](rc://*/tn/help/mat/26/39)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[25:01](rc://*/tn/help/obs/25/01)__ तेव्हा सैतान येशूकडे आला आणि पाप करावे म्हणून त्याची __परीक्षा__ पाहिली.
* __[25:08](rc://*/tn/help/obs/25/08)__ अशा प्रकारे येशू सैतानाच्या __मोहाला__ बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.
* __[38:11](rc://*/tn/help/obs/38/11)__ शिष्यांनी __परिक्षेत__ पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H974, H4531, H5254, G551, G1598, G3985, G3986, G3987