mr_tw/bible/kt/tabernacle.md

32 lines
4.4 KiB
Markdown

# निवासमंडप
## व्याख्या:
निवासमंडप ही एक खास तंबुसारखी बनलेली रचना होती, जिथे 40 वर्षे वाळवंटात प्रवास करताना इस्राएल लोकांनी देवाची उपासना केली.
* देवाने इस्राएलांना या मोठ्या तंबूच्या उभारणीसाठी सविस्तर सूचना दिल्या होत्या, ज्यांमध्ये दोन खोल्या होत्या आणि ते बंद अंगणाने वेढलेले होते.
* प्रत्येक वेळी जेंव्हा इस्राएल लोक वाळवंटात राहण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचे, तेंव्हा याजक लोक तो तंबू काढून घेऊन छावणीच्या परिसरात वाहत घेऊन जायचे. मग ते पुन्हा आपल्या नवीन छावणीच्या मध्यभागी त्याची स्थापना करत.
* निवासमंडप लाकडाच्या रचनांनी बांधण्यात आला होता, त्यावर कापडांपासून, शेळीच्या केसापासून आणि प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले पडदे टांगण्यात आले होते. सभोवतालचे आंगण हे आणखी पडद्यांनी बंदिस्त केलेले होते.
* निवासमंडपाचे दोन भाग होते, पवित्रस्थान (जिथे धूप जाळण्याची वेदी ठेवलेली होती) आणि अति पावित्रस्थान (जिथे कराराचा कोश ठेवण्यात आला होता).
* निवासमंडपाच्या अंगणात बलिदान केलेल्या प्राण्यांना जाळण्यासाठी एक वेदी होती, आणि विधीपूर्वक धुण्यासाठी एक विशिष्ठ धुण्याचे कुंड होते.
* जेंव्हा शलमोनाने यरुशलेम येथे मंदिर बांधले, तेंव्हा इस्राएल लोकांनी निवासमंडपाचा उपयोग करण्याचे बंद केले.
## भाषांतर सूचना
* "निवासमंडप" या शब्दाचा अर्थ "निवासस्थान" असा होतो. ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "पवित्र तंबू" किंवा "तंबू जिथे देव होता" किंवा "देवाचा तंबू" ह्यांचा समावेश होतो.
* या शब्दाचे भाषांतर "मंदिर" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असायला हवे ह्याची खात्री करा.
(हे सुद्धा पहा: [वेदी](../kt/altar.md), [धूपवेदी](../other/altarofincense.md), [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [मंदिर](../kt/temple.md), [मिलापाचा तंबू](../other/tentofmeeting.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 21:28-30](rc://*/tn/help/1ch/21/28)
* [2 इतिहास 01:2-5](rc://*/tn/help/2ch/01/02)
* [प्रेषितांची कृत्ये 07:43](rc://*/tn/help/act/07/43)
* [प्रेषितांची कृत्ये 07:44-46](rc://*/tn/help/act/07/44)
* [निर्गम 38:21-23](rc://*/tn/help/exo/38/21)
* [यहोशवा 22:19-20](rc://*/tn/help/jos/22/19)
* [लेवीय 10:16-18](rc://*/tn/help/lev/10/16)
Strong's: H168, H4908, H5520, H5521, H5522, H7900, G4633, G4634, G4636, G4638