51 lines
7.3 KiB
Markdown
51 lines
7.3 KiB
Markdown
# देवाचा पुत्र, पुत्र
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
"देवाचा पुत्र" या शब्दाचा संदर्भ येशुशी आहे, देवाचा शब्द, जो मनुष्य बनून जगात आला. त्याला वारंवार "पुत्र" असेही संबोधले गेले.
|
||
|
||
* देवाच्या पुत्राचा स्वभाव देवपित्यासारखाच आहे, आणि तो पूर्णपणे देव आहे.
|
||
* देव पिता, देव पुत्र, आणि देव पवित्र आत्मा सर्व एक सार आहेत.
|
||
* मानवी पुत्रांपेक्षा वेगळा, देवाचा पुत्र नेहमी अस्तित्वात आहे.
|
||
* सुरुवातीला, देवाचा पुत्र पिता आणि पवित्र आत्मा यांच्यासह जगाची निर्मिती करण्यात सक्रिय होता.
|
||
|
||
कारण येशू देवाचा पुत्र आहे, म्हणून तो आपल्या पित्यावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतो; आणि त्याचा पिता त्याच्यावर प्रेम कर
|
||
|
||
## भाषांतर सूचना
|
||
|
||
* "देवाचा पुत्र" या संज्ञेसाठी, "पुत्र" हा शब्द त्याच शब्दाने भाषांतर करणे सर्वोत्तम आहे जी भाषा नैसर्गिकरित्या मानवी पुत्राचा संदर्भ देण्यासाठी वापर करील.
|
||
* "पुत्र" या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द "पिता" या शब्दाच्या भाषांतरास्ठी वापरलेल्या शब्दासह उचित बसत असल्याचे आणि हे शब्द सर्वात स्वाभाविक असून ते प्रकल्पित भाषेत एका खऱ्या पिता-पुत्राचा नातेसंबंध व्यक्त करतात हे सुनिश्चित करा.
|
||
* "पुत्र" शब्द लिहिण्यास सुरू करण्याकरिता पहिले अक्षर मोठे वापरणे हे दर्शविते की तो देवाबद्दल बोलत आहे.
|
||
* "पुत्र" हा वाक्यांश "देवाचा पुत्र" या वाक्यांशापासून हृस्वीत केला गेला आहे, विशेषत: जेव्हा तो "पिता" या शब्दाप्रमाणेच संदर्भित होतो.
|
||
|
||
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
||
|
||
(हे देखील पाहा: [ख्रिस्त](../kt/christ.md), [पूर्वज](../other/father.md), [देव](../kt/god.md), [देव पिता](../kt/godthefather.md), [पवित्र आत्मा](../kt/holyspirit.md), [येशू](../kt/jesus.md), [पुत्र](../kt/son.md), [देवाचा पुत्र](../kt/sonsofgod.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [1 योहान 4:10](rc://*/tn/help/1jn/04/09)
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 9:20](rc://*/tn/help/act/09/20)
|
||
* [कलस्सैकरांस पत्र 1:17](rc://*/tn/help/col/01/15)
|
||
* [गलतीकरांस पत्र 2:20](rc://*/tn/help/gal/02/20)
|
||
* [इब्री 4:14](rc://*/tn/help/heb/04/14)
|
||
* [योहान 3:18](rc://*/tn/help/jhn/03/16)
|
||
* [लुक 10:22](rc://*/tn/help/luk/10/22)
|
||
* [मत्तय 11:27](rc://*/tn/help/mat/11/25)
|
||
* [प्रकटीकरण 2:18](rc://*/tn/help/rev/02/18)
|
||
* [रोमकरास पत्र 8:29](rc://*/tn/help/rom/08/28)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* **[22:5](rc://*/tn/help/obs/22/05)** देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. यास्तव ते बाळ पवित्र, **देवाचा पुत्र** असेल.’’
|
||
* **[24:9](rc://*/tn/help/obs/24/09)** देवाने योहानास सांगितले होते, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या व्यक्तिवर पवित्र आत्मा उतरुन येईल. तीच व्यक्ति **देवाचा पुत्र** असेल’’
|
||
* **[31:8](rc://*/tn/help/obs/31/08)** हे पाहून शिष्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी येशूला नमन केले व म्हणाले, ‘‘तू खरोखर, **देवाचा पूत्र** आहेस.’’
|
||
* **[37:5](rc://*/tn/help/obs/37/05)** मार्थाने उत्तर दिले, ‘‘होय,प्रभुजी! आपण **देवाचे पुत्र** मसीहा आहात असा मी विश्वास धरते’’
|
||
* **[42:10](rc://*/tn/help/obs/42/10)** म्हणून जा, सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, **पुत्र** व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.
|
||
* **[46:6](rc://*/tn/help/obs/46/06)** लगेच शौल दिमिष्कामध्ये असणाऱ्या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हाच **देवाचा पुत्र** आहे."
|
||
* **[49:9](rc://*/tn/help/obs/49/09)** परंतु देवाने जगातील प्रत्येकावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकुलता एक **पुत्र** दिला, अशासाठी की जो कोणी येशुवर विश्वास ठेवितो त्याला आपल्या पापांची शिक्षा होणार नाही, पण तो देवाबरोबर सदासर्वकाळ राहील.
|
||
|
||
## शब्द माहीती:
|
||
|
||
* स्ट्रोंग: एच426, एच430, एच1121, एच1247, जी2316, जी5207
|