mr_tw/bible/kt/setapart.md

30 lines
3.5 KiB
Markdown

# वेगळे करणे
## व्याख्या:
"वेगळे करणे" ह्याचा अर्थ विशिष्ठ हेतू पूर्ण करण्याकरिता एखाद्या गोष्टीपासून बाजूला केलेला असा होतो.. त्याचबरोबर, "काही व्यक्तींना किंवा गोष्टींना "वेगळे करणे" म्हणजे त्यांना "बाजूला करणे" होय.
* इस्राएली लोकांना देवाच्या सेवेसाठी वेगळे केलेले आहे.
* पवित्र आत्म्याने अंत्युखीयाच्या ख्रिस्ती लोकांना आज्ञा केली की, पौल आणि बर्णबा ह्यांना देवाला त्यांच्याकडून जे कार्य करून घ्यायचे आहे त्यासाठी वेगळे करा.
* एक विश्वासू ज्याला देवाच्या सेवेसाठी "वेगळे केलेले" आहे, त्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी "समर्पित केलेले" आहे.
* "पवित्र" या शब्दाचा एक अर्थ हा देवाच्या मालकीचा म्हणून वेगळा केलेला आणि जगाच्या पापमय मार्गापासून बाजूला केलेला असा होतो.
* एखाद्याला "पवित्र करणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला देवाच्या देवाच्या सेवेसाठी वेगळे करणे असा होतो.
## भाषांतर सूचना
* "वेगळे करणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "विशेषरित्या निवडणे" किंवा "सर्वांमधून वेगळा करणे" किंवा "विशेष कार्य करण्यासाठी बाजूला काढणे" असे केले जाऊ शकते.
* "वेगळे केलेला असणे" ह्याचे भाषांतर "(च्यापासून) वेगळे केलेले असणे" किंवा "(च्या साठी) विशेषरित्या नियुक्त केलेले असणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [पवित्र](../kt/holy.md), [पवित्र करणे](../kt/sanctify.md), [नियुक्त](../kt/appoint.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [इफिसकरांस पत्र 03:17-19](rc://*/tn/help/eph/03/17)
* [निर्गम 31:12-15](rc://*/tn/help/exo/31/12)
* [शास्ते 17:12-13](rc://*/tn/help/jdg/17/12)
* [गणना 03:11-13](rc://*/tn/help/num/03/11)
* [फिलीप्पेकरास पत्र 01:1-2](rc://*/tn/help/php/01/01)
* [रोमकरास पत्र 01:1-3](rc://*/tn/help/rom/01/01)
Strong's: H2764, H4390, H5674, H6918, H6942, H6944, G37, G38, G40, G873