mr_tw/bible/kt/satan.md

52 lines
7.6 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# सैतान, भूत, दुष्ट
## तथ्य:
जरी सैतान हा देवाने बनवलेला आत्मा आहे, तरी त्याने देवाविरुद्ध बंड केले आणि तो देवाचा शत्रू झाला. भूताला "सैतान" किंवा "दुष्ट" असेही संबोधले जाते.
* देव आणि जे काही देवाने निर्माण केले आहे, त्याचा सैतान तिरस्कार करतो कारण त्याला देवाची जागा घ्यायची आहे आणि देव म्हणून स्वतःची उपासना करवून घ्यायची आहे.
* सैतान लोकांना देवाविरुद्ध बंड करण्यासाठी मोहात पडतो.
* देवाने त्याच्या पुत्राला, येशू, यास लोकांना सैतानाच्या तावडीतून सोडवण्यासाठी पाठविले.
* सैतान या नावाचा अर्थ "विरोधक" किंवा "शत्रू."
* "दुष्ट" या शब्दाचा अर्थ "दोष लावणारा असा आहे"
## भाषांतर सूचना:
* "दुष्ट" या शब्दाचे भाषांतर "दोष लावणारा" किंवा "एक दुष्ट" किंवा "दुष्ट आत्म्यांचा राजा" किंवा "दुष्टात्म्यांचा मुख्य" असे देखील केले जाऊ शकते.
* "सैतान" ह्याचे भाषांतर "विरोधक" किंवा "प्रतिस्पर्धी" किंवा दुसरे एखादे नाव ज्याद्वारे असे दर्शविले जाते की तो दुष्ट आहे, असे केले जाऊ शकते.
* या शब्दाचे भाषांतर "पिसाच्य" आणि "दुष्ट आत्मे" यापासून वेगळे असावे.
* या संज्ञा राष्ट्रीय भाषा किंवा अन्य स्थानिक भाषेत कशा प्रकारे भाषांतरित केल्या जातात ते देखील विचारात घ्या.
(पाहाः [अज्ञात कसे भाषांतरित करावे](rc://*/ta/man/translate/translate-unknown))
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [पिसाच्च](../kt/demon.md), [दुष्ट](../kt/evil.md), [देवाचे राज्य](../kt/kingdomofgod.md), [मोह](../kt/tempt.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 योहान 3:8](rc://*/tn/help/1jn/03/07)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:17-20](rc://*/tn/help/1th/02/17)
* [1 तीमथी 5:15](rc://*/tn/help/1ti/05/14)
* [प्रेषितांची कृत्ये 13:10](rc://*/tn/help/act/13/09)
* [ईयोब 1:8](rc://*/tn/help/job/01/06)
* [मार्क 8:33](rc://*/tn/help/mrk/08/33)
* [जखऱ्या 3:1](rc://*/tn/help/zec/03/01)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[21:01](rc://*/tn/help/obs/21/01)__ ज्या सापाने हव्वेस फसविले तो __सैतान__ होता. अभिवचनाचा अर्थ असा होता की मसिहा __सैतानास__ पुर्णपणे पराजित करील.
* __[25:06](rc://*/tn/help/obs/25/06)__ मग __सैतानाने__ येशूला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले व म्हणाला,‘‘जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.
* __[25:08](rc://*/tn/help/obs/25/08)__ अशा प्रकारे येशू __सैतानाच्या__ मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.
* __[33:06](rc://*/tn/help/obs/33/06)__ म्हणून येशूने स्पष्ट केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे. वाटेवरची जमीन म्हणजे असा व्यक्ती की जो देवाचे वचन ऐकतो पण समजून घेत नाही आणि __सैतान__ येऊन ते मनातून काढून टाकतो.
* __[38:07](rc://*/tn/help/obs/38/07)__ यहूदाने भाकर घेतल्याबरोबर, __सैतानाने__ त्याच्यामध्ये प्रवेश केला.
* __[48:04](rc://*/tn/help/obs/48/04)__ देवाने अभिवचन दिले की हव्वेचा एक वंशज __सैतानाचे__ डोके फोडिल व __सैतान__ त्याची टाच फोडिल. अर्थात __सैतान__ मसिहास जीवे मारील, परंतु देव त्यास पुन्हा जिवंत करील आणि मग मसिहा __सैतानाच्या__ सत्तेचा संपूर्ण नायनाट करील.
* __[49:15](rc://*/tn/help/obs/49/15)__ देवाने आपणांस __सैतानाच्या__ अंधःकारमय राज्यातून काढून आपल्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आणिले आहे.
* __[50:09](rc://*/tn/help/obs/50/09)__ "निदण म्हणजे __सैतानाचे__ लोक. ज्या शत्रूने निदण पेरले, तो शत्रू म्हणजे __सैतान__.
* __[50:10](rc://*/tn/help/obs/50/10)__ "जेव्हा जगाचा शेवट होईल, तेव्हा देवदूत __सैतानाच्या__ सर्व लोकांस एकत्र करून न विझणाऱ्या अग्निमध्ये टाकून देईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल.
* __[50:15](rc://*/tn/help/obs/50/15)__ जेव्हा येशू परत येईल, तो __सैतान__ व त्याच्या राज्याचा नाश करील. तो __सैतानाला__ नरकात टाकील, ज्या ठिकाणी तो सर्वकाळ जळत राहील, त्याच्याबरोबर ज्यांनी त्याच्या मागे जाण्याचे निवडले व देवाची आज्ञा मानली नाही तेही असतील.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H7700, H7854, H8163, G1139, G1140, G1141, G1142, G1228, G4190, G4566, G4567