mr_tw/bible/kt/sanctuary.md

31 lines
4.1 KiB
Markdown

# पवित्रस्थान
## व्याख्या:
"पवित्रस्थान" या शब्दाचा शब्दशः अर्थ "पवित्र ठिकाण" असा होतो आणि त्याचा संदर्भ अशा ठिकाणाशी आहे, ज्याला देवाने पवित्र आणि निर्मळ केले आहे. हे अशा ठिकाणाला संदर्भित करते, जे संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करते.
* जुन्या करारामध्ये, "पवित्रस्थान" या शब्दाचा वारंवार उपयोग निवासमंडपाच्या किंवा मंदिराच्या इमारतीच्या जिथे "पवित्र स्थान" आणि "अति पवित्र स्थान" स्थित आहेत ह्यांच्या संदर्भात केला गेला आहे.
* देवाने पवित्रस्थानाचा संदर्भ अशा जागेला दिला आहे, जिथे तो त्याच्या लोकांच्यामध्ये, इस्राएलामध्ये राहतो.
* तो स्वतःला देखील त्याच्या लोकांच्यासाठी "पवित्र स्थान" किंवा सुरक्षित जागा असे संबोधतो, जिथे त्यांना सुरक्षा प्राप्त होते.
## भाषांतर सूचना
* या शब्दाचा मूळ अर्थ "पवित्र स्थान" किंवा "अशी जागा जी वेगळी केलेली आहे" असा होतो.
* संदर्भावर आधारित, "पवित्रस्थान" या शब्दाचे भाषांतर "पवित्र जागा" किंवा "पवित्र इमारत" किंवा "देवाचे राहण्याचे पवित्र स्थान" किंवा "संरक्षणाचे पवित्र स्थान" किंवा "सुरक्षेचे पवित्र स्थान" असे केले जाऊ शकते.
* "पवित्र स्थानातील शेकेलाचे चलन" या वाक्यांशाचे भाषांतर "निवासमंडपासाठी काही प्रकारचे शेकेल देण्यात आले" किंवा "मंदिराची काळजी घेण्याकरिता भरावयाच्या करामध्ये शेकेलाचा वापर केला जात होता" असे केले जाऊ शकते.
* टीप: * या संज्ञेच्या भाषांतराचा संदर्भ आधुनिक युगातील मंडळींच्या उपासनेच्या खोलीशी येणार नाही ह्याची काळजी घ्या.
(हे सुद्धा पाहा: [पवित्र](../kt/holy.md), [पवित्र आत्मा](../kt/holyspirit.md), [पवित्र करणे](../kt/holy.md), [वेगळा करणे](../kt/setapart.md), [निवासमंडप](../kt/tabernacle.md), [कर](../other/tax.md), [मंदिर](../kt/temple.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [आमोस 07:12-13](rc://*/tn/help/amo/07/12)
* [निर्गम 25:3-7](rc://*/tn/help/exo/25/03)
* [यहेज्केल 25:3-5](rc://*/tn/help/ezk/25/03)
* [इब्री 08:1-2](rc://*/tn/help/heb/08/01)
* [लुक 11:49-51](rc://*/tn/help/luk/11/49)
* [गणना 18:1-2](rc://*/tn/help/num/18/01)
* [स्त्रोत 078:67-69](rc://*/tn/help/psa/078/067)
Strong's: H4720, H6944, G39