mr_tw/bible/kt/sadducee.md

25 lines
2.3 KiB
Markdown

# सदुकी
## व्याख्या:
येशू ख्रिस्ताच्या काळात, सदुकी हा एक यहुदी याजकांचा राजकारणी गट होता. त्यांनी रोमी साम्राज्याला पाठिंबा दिला आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवला नाही.
* बरेच सदूकी श्रीमंत, उच्च दर्जाचे यहुदी होते, जे मुख्य याजक आणि महायाजक यासारख्या शक्तिशाली नेतृत्वाच्या पदावर होते.
* सदूकींच्या कर्तव्यामध्ये मंदिराच्या परिसराची काळजी घेणे आणि याजकाची कार्ये, जसे की बलिदान अर्पण करणे समाविष्ट होते.
* सदूकी आणि परूश्यांनी जोरदारपणे रोमी अधिकाऱ्यांना येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी प्रभावित केले.
* येशू या दोन गटांच्या स्वार्थीपणामुळे आणि ढोंगीपणामुळे त्यांच्या विरुद्धात बोलला.
(हे देखील पाहा: [मुख्य याजक](../other/chiefpriests.md), [परिषद](../other/council.md), [महायाजक](../kt/highpriest.md), [ढोंगी](../kt/hypocrite.md), [यहुदी पुढारी](../other/jewishleaders.md), [परुशी](../kt/pharisee.md), [याजक](../kt/priest.md))
## पवित्र बायबलमधील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 4:3](rc://*/tn/help/act/04/01)
* [प्रेषितांची कृत्ये 5:17-18](rc://*/tn/help/act/05/17)
* [लुक 20:27](rc://*/tn/help/luk/20/27)
* [मत्तय 3:7](rc://*/tn/help/mat/03/07)
* [मत्तय 16:1](rc://*/tn/help/mat/16/01)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: जी4523