mr_tw/bible/kt/righthand.md

39 lines
7.1 KiB
Markdown

# उजवा हात
## व्याख्या:
"उजवा हात" हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या उजव्या बाजूस असलेल्या हाताला सूचित करतो.बायबलमध्ये, हा शब्द बहुतेक वेळा लाक्षणिक अर्थाने एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूस शरीराचे इतर अवयव, एखाद्या व्यक्तीची उजवी दिशा, दक्षिण दिशा, किंवा एखाद्या शासकाच्या किंवा इतर महत्वाच्या व्यक्तीच्या उजव्या बाजूचे सन्मान किंवा सामर्थ्याचे स्थान यांस संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
* उजवा हात हा शक्ती, अधिकार, किंवा सामर्थ्याचे चिन्ह म्हणून देखील वापरला जातो.
* पवित्र शास्त्र येशूचे वर्णन देव पित्याच्या "उजव्या हाताला" विश्वासणाऱ्यांच्या शरीराचा (मंडळी) मुख्य म्हणून आणि सर्व सृष्टीचा शासक म्हणून नियंत्रण करण्यासाठी बसला आहे, असे करते.
* एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिल्या जातो तेव्हा विशेष सन्मान दर्शवण्यासाठी एका व्यक्तीच्या उजव्या हाताचा वापर केला जात असे (जसे कुलपिता याकोबाने योसेफाचा मुलगा एफ्राईम याला आशीर्वाद दिला).
* एखाद्याच्या "उजव्या हातकडे सेवा" करणे म्हणजे ज्याची सेवा त्या व्यक्तीसाठी विशेषतः उपयुक्त आणि महत्वाची असते.
## भाषांतर सूचना
* काहीवेळा "उजवा हात" ही संज्ञा अक्षरशः त्या व्यक्तीच्या उजव्या हाताला सुचित करते, जसे की रोमी अधिकाऱ्याने येशुची थट्टा करण्याकरिता त्याच्या हातामध्ये वेत दिला. एखाद्या भाषेमध्ये हातासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा उपयोग करून त्याला भाषांतरित करावे.
* लाक्षणिक उपयोगांबाबत, जर "उजवा हात" या संज्ञेचा समावेश असलेल्या अभिव्यक्तीचा प्रकल्पित भाषेत समान अर्थ नसेल, तर त्या भाषेमध्ये त्याच अर्थाची भिन्न अभिव्यक्ती आहे का याचा विचार करा.
* "उजव्या हाताला" या अभिव्यक्तीचे भाषांतर "च्या उजव्या बाजूला" किंवा "सन्मानाच्या बाजूला" किंवा "सामर्थ्याच्या स्थितीत" किंवा "मदतीसाठी तयार" असे केले जाऊ शकते.
* "त्याच्या उजव्या हाताने" याचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "अधिकाराने" किंवा "शक्तीचा वापर" किंवा "त्याच्या आश्चर्यकारक सामर्थ्याने" या अभिव्यक्तींचा समावेश असु शकतो.
* “त्याचा उजवा हात आणि त्याची सामर्थी बाहू” ही लाक्षणिक अभिव्यक्ती देवाच्या सामर्थ्यावर आणि मोठ्या सामर्थ्यावर जोर देण्याचे दोन पध्दतीचा वापर करते. या अभिव्यक्तीचे भाषांतर करण्याचा एक मार्ग "त्याची आश्चर्यकारक बळ आणि पराक्रमी शक्ती" हा असू शकतो. (पाहा: [समांतरवाद](rc://*/ta/man/translate/figs-parallelism))
* "त्यांचा उजवा हात खोटा आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्यांच्यातील सर्वात सन्माननीय गोष्ट देखील खोटेपणामुळे दूषित झाली आहे" किंवा "त्यांचे सन्मानाचे स्थान फसवणूकीमुळे दूषित झाले आहे" किंवा "ते स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी असत्याचा उपयोग करतात" असे केले जाऊ शकते
(हे देखील पाहा: [आरोप](../other/accuse.md), [वाईट](../kt/evil.md), [सन्मान](../kt/honor.md), [पराक्रमी](../other/mighty.md), [शिक्षा](../other/punish.md), [बंडखोर](../other/rebel.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये २:३३](rc://*/tn/help/act/02/32)
* [कलस्सैकरांस पत्र ३:१](rc://*/tn/help/col/03/01)
* [गलतीकरांस पत्र २:९](rc://*/tn/help/gal/02/09)
* [उत्पत्ति ४८:१४](rc://*/tn/help/gen/48/14)
* [इब्री लोकांस पत्र १०:१२](rc://*/tn/help/heb/10/11)
* [विलापगीत २:३](rc://*/tn/help/lam/02/03)
* [मत्तय २५:३३](rc://*/tn/help/mat/25/31)
* [मत्तय २६:६४](rc://*/tn/help/mat/26/62)
* [स्तोत्र ४४:३](rc://*/tn/help/psa/044/003)
* [प्रकटीकरण २:१-२](rc://*/tn/help/rev/02/01)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: एच3225, एच3231, एच3233, जी11880