mr_tw/bible/kt/remnant.md

27 lines
3.0 KiB
Markdown

# उरलेले
## व्याख्या:
"उरलेले" या शब्दाचा शब्दशः अर्थ मोठ्या संख्येमधून किंवा समूहातील "राहिलेले" किंवा "शिल्लक राहिलेले" लोक किंवा गोष्टी असा होतो.
* बऱ्याचदा "उरलेले" या शब्दाचा संदर्भ लोकांशी आहे,जर जीवघेण्या परिस्थितीतून जिवंत राहिले किंवा ज्यांचा छळ होत असतानासुद्धा ते देवाशी विश्वासू राहिले.
* यशायाने यहुद्यांच्या समूहाला, जे बाहेरच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यातून वाचले आणि वचनदत्त भूमी कनानमध्ये राहायला परत आलेल्या लोकांना, उरेलेले असे संदर्भित केले,
* पौल देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी निवडलेल्या लोकांच्याबद्दल बोलताना त्यांना "उरलेले" असे म्हणतो.
* "उरलेले" या शब्दाचा अर्थ, असे अनेक लोक होते, जे विश्वासू राहिले नाहीत किंवा जे टिकून राहिले नाहीत, किंवा ज्यांना निवडले नव्हते असा होतो.
## भाषांतर सूचना
* "या लोकांच्यातील उरलेले" या वाक्यांशाचे भाषांतर, "या लोकांच्यातील शिल्लक राहिलेले" किंवा "लोक जे विश्वासू राहिले" किंवा "लोक जे शिल्लक राहिले" असे केले जाऊ शकते.
* "संपूर्ण उरलेले लोक" ह्याचे भाषांतर "उरलेले सगळे लोक" किंवा "शिल्लक राहिलेले लोक" असे केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 15:15-18](rc://*/tn/help/act/15/15)
* [आमोस 09:11-12](rc://*/tn/help/amo/09/11)
* [यहेज्केल 06:08-10](rc://*/tn/help/ezk/06/08)
* [उत्पत्ति 45:7-8](rc://*/tn/help/gen/45/07)
* [यशया 11:10-11](rc://*/tn/help/isa/11/10)
* [मीखा 04:6-8](rc://*/tn/help/mic/04/06)
Strong's: H3498, H3499, H5629, H6413, H7604, H7605, H7611, H8281, H8300, G2640, G3005, G3062