mr_tw/bible/kt/rabbi.md

29 lines
2.8 KiB
Markdown

# गुरुजी
## व्याख्या:
"गुरुजी" या शब्दाचा शब्दशः अर्थ "माझे स्वामी" किंवा "माझे शिक्षक" असा होतो.
* हे एक आदराचे शीर्षक होते, ज्याचा उपयोग अशा मनुष्याला उद्देशून केला जातो, जो यहुदी धार्मिक शिक्षक होता, विशेषकरून देवाच्या नियमशास्त्राचा शिक्षक.
* बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू या दोघांनाही काहीवेळा त्यांच्या शिष्यांनी "गुरुजी" म्हणून संबोधित केले.
## भाषांतर सूचना:
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "माझे स्वामी" किंवा "माझा शिक्षक" किंवा "सन्माननीय शिक्षक" किंवा "धार्मिक शिक्षक" ह्यांचा समावेश होतो. काही भाषा असे अभिवादन करू शकतात, तर इतर भाषा करणार नाहीत.
* प्रकल्पित भाषेत, शिक्षकांना सामान्यपणे संबोधित करण्यासाठी, कदाचित विशिष्ठ मार्ग असू शकतो.
* या संज्ञेचे भाषांतर येशू हा शाळेचा शिक्षक होता, असे सूचित करत नाही, ह्याची खात्री करा.
* संबंधित किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत "गुरुजी" या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे, हे देखील विचारात घ्या.
(पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://*/ta/man/translate/translate-unknown))
(हे सुद्धा पाहा: [शिक्षक](../other/teacher.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [योहान 01:49-51](rc://*/tn/help/jhn/01/49)
* [योहान 06:24-25](rc://*/tn/help/jhn/06/24)
* [मार्क 14:43-46](rc://*/tn/help/mrk/14/43)
* [मत्तय 23:8-10](rc://*/tn/help/mat/23/08)
Strong's: G4461